Parbhani Crime : परभणीला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीत आढळला मृतदेह! चार दिवस सडला, शहरवासियांना पिण्यासाठी तेच पाणी
परभणीत पाणी पुरवठा करणाऱ्या जलकुंभात चक्क मृतदेह आढळला आहे. अशा स्थितीही चार दिवस अनेक भागाला पाणीपुरवठा सुरू होता. कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागल्याने अधिकाऱ्यांनी तापसणी करण्याचे आदेश दिले.
परभणी : परभणीत (Parbhani Crime) एक असा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जो वाचून कुणाच्याही उलट्या होतील. कारण परभणीत पाणी पुरवठा करणाऱ्या (Watter Supply) जलकुंभात चक्क मृतदेह (Death Body)आढळला आहे. अशा स्थितीही चार दिवस अनेक भागाला पाणीपुरवठा सुरू होता. कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागल्याने अधिकाऱ्यांनी तापसणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हा भयानक प्रकार निदर्शनास आला आहे. हा मृतदेह पाण्यात असताना तसाच चार दिवस या या भागातील काही परिसराला पाणिपुरवठा होत होता. काही लोकांनी मृतदेह पाण्यात असताना आलेलं पाणी वापरल्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताव व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार पाहून अनेकांची झोप उडाली आहे. या प्रकरणावर पालिकेने मात्र चुप्पी बाळगली आहे.
पोलिसांच्या हाती काय माहिती लागली?
हा प्रकार उघडकीय येताच या प्रकरणात तात्काळ पोलिसांनी एन्ट्री घेतली आहे आणि हा मृत व्यक्ती कोण आहे. तो कुठून आला आहे? याचा छडा लावला आहे. त्यात समोर आलेली माहिती अशी आहे की, शेख अय्युब असे मृतांचे नाव असून तो हिंगोली जिल्ह्यातील हट्टा येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. सलग चार दिवसांपासून यांचे शव पिण्याच्या पाण्यात असण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
काही दिवस आधीपासून बेपत्ता
मृत अय्युब 19 तारखे पासून बेपत्ता होता, परभणीच्या नानलपेठ पोलोसात याप्रकरणी मिसिंग असल्याची तक्रार दाखल आहे असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यांचे मानसिक संतुलन व्यवस्थित नसल्याची माहिती त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी दिली आहे. तसेच अमेय नगर, आलमगीर कॉलोनी, रहेमत नगर या भागात याच जलकुंभागातून पाणी पुरवठा केला जात आहे. पाण्याचा गेज मीटर काम करत नसल्याने मनपा कर्मचाऱ्यांनी अभियंता यांना सूचित केल्याने प्रकार समोर आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच 10 तारखेलाच या जलकुंभातून पिण्यासाठी पाणी वितरित करण्यात आलं.
प्रकरणात आणखी नवं ट्विस्ट येणार?
पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकणात आणखी काही नवं ट्विस्ट येतं का? याकडेही परभणीकरांच्या नजरा लागल्या आहेत. तसेच या प्रकरणात आतापर्यंत गप्प असलेली पालिका काय स्पष्टीकरण देते हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण या प्रकरणावरून आता त्या भागातील नागरिकही आक्रमक होण्याची शक्यता आाहे.