Parbhani : …अखेर रत्नाकर गुट्टे ‘गुतले’, दोन दिवसांपूर्वीचे ‘ते’ वक्तव्य भोवलं, तरीही भूमिकेवर मात्र ठाम..!

गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रत्येक शहरामध्ये सार्वजनिक उत्सव समितीच्या बैठकीचे आयोजन केले जाते. त्याच अनुशंगाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथेही ही बैठक पार पडली. या बैठकीत लोकप्रिनीधी म्हणून आमदार रत्नाकर गुट्टे हे देखील उपस्थित होते. त्यांच्याबरोबर शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी तसेच पोलिस अधिकारी हे देखील उपस्थित होते. भर कार्यक्रमात गुट्टे यांनी पोलिस कसे हप्तेखोर आहेत याचा उल्लेख केला.

Parbhani : ...अखेर रत्नाकर गुट्टे 'गुतले', दोन दिवसांपूर्वीचे 'ते' वक्तव्य भोवलं, तरीही भूमिकेवर मात्र ठाम..!
आ. रत्नाकर गुट्टे
Follow us
| Updated on: Sep 01, 2022 | 11:05 PM

परभणी : दोन दिवसांपूर्वी एका वादग्रस्त विधानावरुन (Ratnakar Gutte) आ. रत्नाकर गुट्टे अन् (Gangakhed) गंगाखेडच पोलीस आमने-सामने आले होते. सार्वजिनक उत्सव समिती आयोजित कार्यक्रमात त्यांनी पोलीस हे हप्ते कसे घेतात हेच सांगितले. शिवाय व्यासपीठावर वरीष्ठ (Gangakhed Police) पोलीस अधिकारी उपस्थित असताना गुट्टे यांनी मात्र, आरोपांची फायरिंग कायम ठेवली होती. या दरम्यान, पोलीस आणि गुट्टे यांच्यामध्ये शाब्दिक चकमकही झाली होती. मात्र, सार्वजनिक उत्सव समितीच्या शांतता कमिटीच्या बैठकीत अधिकचा गोंधळ नको म्हणून सर्वांनीच आवरते घेतले. पण दोन दिवसानंतरच गुट्टे यांच्या वक्तव्याचे परिणाम पाहवयास मिळाले आहेत. गंगाखेड पोलिसांनी हफ्ते खोरीचा आरोप केल्याप्रकरणी गुट्टे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दोन दिवसांपूर्वी काय झाले होते?

गणेश उत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रत्येक शहरामध्ये सार्वजनिक उत्सव समितीच्या बैठकीचे आयोजन केले जाते. त्याच अनुशंगाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथेही ही बैठक पार पडली. या बैठकीत लोकप्रिनीधी म्हणून आमदार रत्नाकर गुट्टे हे देखील उपस्थित होते. त्यांच्याबरोबर शहरातील प्रतिष्ठीत नागरिक, व्यापारी तसेच पोलिस अधिकारी हे देखील उपस्थित होते. भर कार्यक्रमात गुट्टे यांनी पोलिस कसे हप्तेखोर आहेत याचा उल्लेख केला. यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होते. तर चौकाचौकात सर्वसामान्यांची कशी लूट केली जाते हे देखील त्यांनी सांगितले. यावरुन पोलिसांमध्ये संताप निर्माण झाला होता. पण तो कार्यक्रमात पार पाडला गेला.

दोन दिवसानंतर गुन्हा दाखल

भर कार्यक्रमात पोलिसांनी होत असलेले आरोप ऐकूण घेतले असले तरी, दोन दिवसानंतर त्या वक्तव्याचे पडसाद पाहवयास मिळाले आहेत. कारण गंगाखेड पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुट्टे यापूर्वीही अनेक प्रकरणावरुन चर्चेत राहिलेले आहेत. आता तर त्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले होते. पोलीस आणि लोकप्रतिनीधी यांच्यातील शीतयुद्ध हे काही नवीन नाही पण गुट्टे यांनी भर कार्यक्रमात आरोप केल्याचे परिणाम पाहयवयास मिळाले आहेत.

तरीही बोलतच राहणार

गंगाखेड पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या सांगण्यावरुन गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यामुळे आपण आपल्या भूमिकेवरुन माघार घेणार असे नाही. शिवाय आगामी काळातही अवैध धंद्याविरोधात आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे प्रकरण येथेच संपले असे नाही. आगामी काळात काय होणार हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.