Parbhani Food Poisoning : लग्नाच्या जेवणातून विषबाधा, 100 पेक्षा अधिक लोक रुग्णालात दाखल, परभणीत खळबळ
परभणी शहरातील दर्गा रोड येथील ही घटना आहे. विषबाधा झालेल्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे.
परभणी : परभणीत लग्नाच्या जेवणातून (Wedding Food) 100 पेक्षा अधिक लोकांना विषबाधा (Parbhani Food Poisoning) झाली आहे. या सर्वांना उपचारासाठी रुग्णालात दाखल करण्यात आलं आहे. परभणी शहरातील दर्गा रोड येथील ही घटना आहे. विषबाधा झालेल्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू (Hospital) असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. रुग्णालया प्रशासनाचीही या घटनेने झोप उडवली आहे. या दिवसात लग्नसराईत अनेक ठिकाणी लग्नांचा धडाका सुरू आहे. मात्र जेवणाची योग्य काळजी न घेतल्यास तुमच्या आनंदात कधीही विर्जन पडू शकतं असेच हे उदाहण आहे. एकाच वेळी एवढ्या लोकांना त्रास होऊ लागल्याने या परिसरातही खळबळ माजली आहे. यांना बरे करण्यासाठी आता डॉक्टरांची टीम कामाला लागली आहे. लवकरच सकारात्मक परिणाम दिसतील अशी अपेक्षा आहे.
नेमकं काय घडलं?
दर्गा रोड परिसरामध्ये आज एक विवाह समारंभ होता. या विवाह समारंभामध्ये जेवणाच्या नंतर काही वेळाने, शंभर ते दीडशे लोकांना उलट्या आणि मळमळ सत्र सुरू झाला , तर काही जणांना चक्कर येऊ लागले. त्यामुळे त्यांना परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू असून ,सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे तुर्तास का होईना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र हे लोक पूर्ण बरे झाल्याशिवाय परिस्थिती पूर्वपदावार येणार नाही.
किती वाजता जेवण? किती वाजता त्रास?
शहरातील दर्गा रोड परिसरात असलेल्या मेहबूब फंक्शन हॉल याठिकाणी हा लग्न आयोजित करण्यात आला होता वधूपक्ष हे परभणीचे असून वर पक्ष जालना जिल्ह्याचे आहेत. वधूच्या वडिलांचा नाव कलीम अन्सारी आहे , त्यांच्या काडून निमंत्रण देण्यात आले होते . यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान संध्याकाळी पाच वाजता हा लग्न सोहळा पार पडला आणि सात वाजता जेवण देण्यात आले जेवणानंतर काहींना मळमळ आणि चक्रा येत असल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले बघता बघता 100 ते दीडशे वऱ्हाडी ना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तत्परता दाखवत उपचार सुरू केले अद्यापपर्यंत कोणीही गंभीर असल्याची माहिती मिळाली नाही. तसेच अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.