AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पारनेरमध्ये थरार, पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकावर गोळीबार, 5 लाख लुटले

पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या बेलवंडी फाटा शाखेच्या शाखाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. शाखेतून पाच लाख रुपयांची चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पारनेरमध्ये थरार, पतसंस्थेच्या शाखा व्यवस्थापकावर गोळीबार, 5 लाख लुटले
पारनेर
| Edited By: | Updated on: Aug 07, 2021 | 6:42 PM
Share

अहमदनगर: पारनेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या बेलवंडी फाटा शाखेच्या शाखाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आला आहे. शाखेतून पाच लाख रुपयांची चोरी झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. व्यवस्थापक बाळासाहेब रामचंद्र सोनवणे (रा. सोबलवाडी) यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आरोपीच्या शोधासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आले असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी दिली आहे.

व्यवस्थापक गंभीर जखमी

श्रीगोंदा, पारनेर तालुक्यासह विविध ठिकाणी पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे जाळे आहे. श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा येथे पारनेर ग्रामीण पतसंस्थेचे व्यवहार आज सकाळी सुरू झालेले होते. दुपारी दोनच्या सुमारास या ठिकाणी गाडीवरून एक जण आला होता. त्याने पतसंस्थेमध्ये प्रवेश करत पतसंस्थेमधून पाच लाख रुपये घेऊन पळून जात असताना शाखा व्यवस्थापक यांनी त्याला ती रक्कम नेण्यास मज्जाव केल्यानंतर संबंधित चोरट्याने त्याच्या हातामध्ये असलेल्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी व्यवस्थापकाच्या दिशेने झाडली. या घटनेमध्ये सोनवणे हे गंभीर जखमी झाले आहेत. सदर आरोपीने पाच लाखाची रोकड लंपास केले आहे नेमका तो दुचाकी वर आला असल्यामुळे तो कोणत्या बाजूने कसा गेला याचा शोध घेतला जात आहे त्याच्या समवेत साथीदार आहेत का याचा सुध्दा तपास सुरू झाला आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

सदरची घटना घडल्यानंतर सुपासह श्रीगोंदा तालुक्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यातच या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी घटनास्थळी धाव घेतली असून विशेष पथक सुद्धा आरोपीच्या शोधार्थ पाठविले आहे. दरम्यान भर दिवसा अशा प्रकारची पटला घडल्यामुळे तालुक्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणात संदर्भामध्ये सुपा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्याचे काम काम सुरू होते

इतर बातम्या:

VIDEO : Bajrang Punia : पैलवान बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात

Breaking: बजरंग बली की जय!! पैलवान बजरंग पुनियाला कुस्तीत कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर 8-0 ने मात

Parner firing on branch manager of Parner village cooperative credit society five lakh theft

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.