Patna Gold Robbery : पटण्यात दिवसाढवळ्या लुटलं 8 किलो सोनं, कसा मारला तब्बल 4 कोटींचा डल्ला? वाचा
मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारांनी जेव्हा दरोडा टाकला तेव्हा कंपनीत गार्ड एकटाच होता. 5 गुन्हेगारांनी त्यांना पिस्तुलाच्या निशाण्यावर ठेवून लुटण्यास सुरुवात केली. घाईगडबडीत गुन्हेगार सापडलेले सोने घेऊन पळाले.
पटणा : बिहारची राजधानी पटणामध्ये (Patna Gold Robbery) धाडसी चोरट्यांनी (Robbery) एक मोठी दरोडा टाकला आहे. गार्डनीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुन्हेगारांनी तब्बल आठ किलो सोनं लुटलं आहे. पाच जणांच्या टोळीने आयआयएफएल गोल्ड लोन कंपनीचे आठ किलो सोने लुटून पळ काढल्याचे पोलिसांनी (Patna Police) सांगितले आहे. या सोन्याची किंमत करोडोंमध्ये आहे. दरोड्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले मात्र तोपर्यंत चोर पसार झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार गुन्हेगारांनी जेव्हा दरोडा टाकला तेव्हा कंपनीत गार्ड एकटाच होता. 5 गुन्हेगारांनी त्यांना पिस्तुलाच्या निशाण्यावर ठेवून लुटण्यास सुरुवात केली. घाईगडबडीत गुन्हेगार सापडलेले सोने घेऊन पळाले. आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ही चोरी करताना चोरांनी सावध पवित्रा घेतला, एकाने गार्डला पिस्तुल लावली, दोघांनी पाहरा दिला, तर दोघांनी सोनं लुटलं.
पोलिसांनी काय माहिती दिली?
याप्रकरणी पटणाचे एसएसपी मानवजीत सिंह ढिल्लन यांनी सांगितले की, हा फायनान्स कंपनीत दरोडा पडला आहे. ही कंपनी गोल्ड लोन देते. दरोड्यानंतर पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत आहे. त्यांनी सांगितले की, पोलिसांचे पथक पटनाच्या अनेक भागात दरोडेखोरांना पकडण्यासाठी छापे टाकत आहे. दरोडेखोरांबाबत कोणताही सुगावा लागावा यासाठी जवळपास बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचीही पडताळणीही केली जात आहे. मात्र अद्याप तरी हाती काही लागलं नाही. त्यामुळे यांना पकडण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.
एका तासातील दुसरी घटना
पटणातील गार्डनीबाग परिसरातून तासाभराच्या अंतरातच गुन्हेगारांनी दुसरी दरोड्याची घटना घडवून आणली आहे. गरदानीबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनिशाबाद हद्दीतील महालक्ष्मी ज्वेलर्सवर 5 सराईत गुन्हेगारांनी पिस्तुलाच्या धाकाने दरोडा टाकला आहे. गुन्हेगारांनी दुकानात दरोडा टाकला तेव्हा दुकान मालक एकटाच होता. 5 गुन्हेगारांनी त्यांना पिस्तुलाच्या निशाण्यावर ठेवत लुटण्यास सुरुवात केली. घाईघाईत गुन्हेगारांनी सापडलेले दागिने काढून घेतले. त्यांची एकूण किंमत किती आहे हे जरी ते सांगू शकले नसले तरी या सोन्याची किंमत ही जवळपास 4 कोटींच्या असपास असल्याचे सांगितले जात आहे.