शिक्षणाच्या नावाखाली नको ते धंदे, बाप राबराब राबतोय अन् तिने मात्र… डोकं फिरवणारी घटना काय ?
पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यावर संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी ती विद्यार्थिनी आणि तिची मैत्रीण या दोघींनाही अटक केली असून त्यांच्याकडून चार मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.
पाटणा | 23 सप्टेंबर 2023 : मुलांना चांगलं आयुष्य देण्यासाठी आई-वडील बरीच मेहनत करतात. काही मुलांना याची जाण असते पण काही मुलांना ते लक्षातच येत नाही. पैशांसाठी, चैनीच्या वस्तूंसाठी ते आई-बाबांच्या मागे लागतात. आणि हवं ते मिळालं नाही तर मग वाईट मार्गही अवलंबू शकतात. अशीच एक घटना पाटणा येथेही घडली आहे. तेथे एका मुलीने वडिलांकडे पैसे मागितले पण ते देण्यासाठी वडिलांनी असमर्थता दर्शवल्यावर तिने असा खतरनाक प्लान (crime news) आखला की ज्यामुळे सगळेच हैराण झाले. या प्लानिंगसाठी तिने तिच्या मैत्रिणीचीदेखील मदत घेतली.
अपहरण, खंडणीची (kidnapping) ही कहाणी आहे बिहारमधली… हे वृत्त दानापूरमधील असून तिथल्या फुलवारीशरीफ गावच्या रहिवासी असलेल्या आणि कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थिनीने तिच्या मैत्रिणीसोबत मिळून अपहरण आणि खंडणीचा बनावट खेळ रचला. मात्र सतर्क पोलिसांनी हा खेळ वेळीच उघडकीस आणला आणि सगळा प्लान फसला. पोलिसांनी यांसदर्भात अधिक खुलासा केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीला कलकत्ता येथे जाऊन सीएचं शिक्षण घ्यायचं होतं. त्यासाठीच तिने मैत्रिणीसोबत मिळून स्वत:च्या अपहरणाचा कट आखला. याप्रकरणाची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी दोन दिवस सतत शोध घेतला. अखेर मोबाईल टॉवर लोकेशनच्या मदतीने पोलिसांनी राजगीर येथील एका हॉटेलमधून त्या विद्यार्थिनीला अटक केली. तर कापड व्यापारी असलेल्या तिच्या वडिलांकडून खंडणी मागणाऱ्या त्या मुलीच्या मैत्रीणीला दुसऱ्या भागातून ताब्यात घेतले.
अपहरणाचा प्लान आखणाऱ्या या दोन मुलींना बेड्या ठोकल्यानंतर पोलिसांनी त्या दोघींकडून चार मोबाईल फोनही जप्त केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीला बाहेर जाऊन शिकायचे होते, पण तिचे वडील तिला पैसे देत नव्हते म्हणूनच तिने स्वत:च्या अपहरणाचा कट आखत वडिलांकडून खंडणी म्हणून पैसे मागितले. तर या प्लानमध्ये तिची मदत करणाऱ्या मैत्रीणीच्या डोक्यावरही कर्ज होते, ते तिला फेडायचं होतं म्हणून तिने आरोपी मुलीची मदत केली, असे पोलिसांनी संगितले.