Video : बदलापुरात पाळीव कुत्र्याचा चिमुरड्यावर हल्ला, कुत्र्याच्या मालकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, व्हिडीओ सीसीटिव्हीत कैद

ही सगळी घटना जिन्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेनंतर निलेश बांगे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 289 आणि 337 अन्वये कुत्र्याचे मालक भावेश चौहान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

Video : बदलापुरात पाळीव कुत्र्याचा चिमुरड्यावर हल्ला, कुत्र्याच्या मालकावर पोलिसांकडून गुन्हा दाखल, व्हिडीओ सीसीटिव्हीत कैद
बदलापुरात पाळीव कुत्र्याचा चिमुरड्यावर हल्लाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 7:17 AM

बदलापूर – एका पाळीव कुत्र्यानं (Dog) इमारतीतल्या (Building) एका लहान मुलावर चावा घेतला आहे. ही घटना बदलापुरात घडली आहे. घाबरलेल्या पालकांनी थेट पोलिस स्टेशन (Badlapur Police) गाठलं आहे. तसेच संबंधित पाळीव कुत्र्याच्या मालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलगा त्याच्या पालकांसोबत इमारतीमधील पायरीवरून खाली जात होता. त्याचवेळेस अचानक घरातून आलेल्या पांढऱ्या रंगाचे कुत्र्याने मुलाच्या पायाला चावा घेतला. आता प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये गेलं आहे. कुत्र्याच्या मालकाविरोधात पोलिस काय कारवाई करतात हे पाहावं लागेल.

सीसीटीव्ही व्हिडीओत काय आहे

बदलापूर पश्चिमेच्या बॅरेज रोडला रितू वर्ल्ड नावाची सोसायटी आहे. या सोसायटीतल्या ‘ई’ बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावर निलेश बांगे हे परिवारासह वास्तव्याला आहेत. त्याच इमारतीत पाचव्या मजल्यावर भावेश चौहान हे देखील राहतात. चौहान यांच्याकडे पांढऱ्या रंगाचा एक पाळीव कुत्रा आहे. शनिवारी दुपारी पावणेबाराच्या सुमारास निलेश बांगे हे त्यांचा मुलगा गौरांग याच्यासह जिन्याने खाली उतरत होते. ते पाचव्या मजल्यावर आले असता अचानक भावेश चौहान यांच्या घरातून त्यांचा पाळीव कुत्रा धावत आला आणि त्याने गौरांगवर हल्ला चढवत त्याच्या पायाचा चावा घेतला. यावेळी निलेश यांनी कुत्र्याला हाकलल्याने तो आत पळाला. ही सगळी घटना जिन्यात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या घटनेनंतर निलेश बांगे यांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 289 आणि 337 अन्वये कुत्र्याचे मालक भावेश चौहान यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर आपले पाळीव कुत्रे हे इतरांसाठी धोकादायक ठरू नये, आणि आपल्यासाठीही डोकेदुखी ठरू नये, याची काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

पाळीव कुत्र्यांची मालकांनी काळजी घ्यायला हवी

अनोळखी व्यक्ती घरात किंवा घराच्या आसपास आल्यानंतर कुत्र्यांकडून अनेकदा असा हल्ला झाला आहे. त्यामध्ये अनेक नागरिकांना मोठ्या जखमा देखील झाल्या आहेत. ज्या असे पाळीव कुत्रे आहेत, त्यांनी त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे.

बदलापूरातल्या प्रकरणात पोलिसांनी मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.