चालत्या गाडीवर अंघोळ करणे महागात पडले, पोलिसांकडून रील्स बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

चालत्या गाडीवर बसून अंघोळ करतानाचा तरुण-तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. मात्र व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला आहे.

चालत्या गाडीवर अंघोळ करणे महागात पडले, पोलिसांकडून रील्स बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल
चालत्या गाडीवर अंघोळ करणाऱ्यांवर कारवाईImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 5:45 PM

निनाद करमरकर : उल्हासनगरमध्ये वाढत्या गर्मीवर उपाय म्हणून चालत्या गाडीवर अंघोळ करतानाचा व्हिडिओ एका तरुण-तरुणीने तयार केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलिसांनी या रिल्स तयार करणाऱ्या तरुण-तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. स्वतःच्या अंगावर पाणी ओतून घेत असताना त्यामुळे इतर वाहन चालकांचा अपघात होईल, अशी परिस्थिती निर्माण करणे, तसेच हेल्मेट परिधान न करता एका हाताने गाडी चालवणे, असे आरोप गुन्ह्यात या दोघांवर ठेवण्यात आल्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

चालत्या गाडीवर अंघोळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

उल्हासनगरमधील आदर्श शुक्ला आणि एका तरुणीने वाढत्या गर्मीवर उपाय शोधला. दुचाकीवर पाण्याची बादली आणि मग घेऊन फिरत चालत्या गाडीवर अंगावर पाणी ओतून घेत असतानाचा एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ रिल्सच्या स्वरूपात इन्स्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ उल्हासनगरमध्ये चांगलाच व्हायरल झाला होता. माध्यमांनीही या व्हिडिओची बातमी प्रसारित केली होती.

तरुण-तरुणीवर गुन्हा दाखल

व्हिडिओ व्हायरल होताच उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांनी ही रील्स तयार करणारा तरुण आदर्श शुक्ला आणि त्याच्या मागे बसलेल्या तरुणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भादंवि 279 आणि मोटर वाहन कायद्यान्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये या दोघांनाही प्रत्येकी 5 हजार रुपये दंड आणि 6 महिन्यांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.