Gondia Crime : क्रेडिट कार्डवर लोन काढून गंडवायचे, सहा भामट्यांना अखेर अटक

एका फसवणुकीचा गुन्हा गोंदियामध्ये उघडकीस आला आहे. क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून लोन घेऊन निम्मी रक्कम आपल्या खात्यावर वळवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.

Gondia Crime : क्रेडिट कार्डवर लोन काढून गंडवायचे, सहा भामट्यांना अखेर अटक
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Dec 09, 2023 | 2:43 PM

शाहिद पठाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, गोंदिया | 9 डिसेंबर 2023 : आजकाल आर्थिक फसवणुकीचे गुन्हे बरेच वाढले आहेत. साध्या, भोळ्या नागरिकांना भुलवून त्यांची ऑनलाइन किंवा गोड बोलून गंडा घालून आर्थिक फसवणूक केली जाते. मात्र यामुळे फसवल्या गेलेल्या इसमाचा मनस्ताप वाढतो, नुकसानही होतं. अशा गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी पोलिस बरेच प्रयत्न करत असले तरीही गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच चालले आहे.

अशाच एका फसवणुकीचा गुन्हा गोंदियामध्ये उघडकीस आला आहे. क्रेडिट कार्डवर लोन मिळवून देण्याच्या नावावर बनावट कागदपत्रे तयार करून 7 लाखांचे लोन घेऊन 70 टक्के रक्कम आपल्या खात्यावर वळवून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी त्यांना इंगा दाखवला आहे. या प्रकरणात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, होमगार्ड धनराज पुंडलिक सयाम (30) हे गोंदिया जिल्ह्याचा सडक-अर्जुनी तालुक्यातील खाडीपार येथ राहतात. क्रेडिट कार्डवर 7 लाख रुपयांचे लोन मिळवून देण्यासाठी त्यांच्या नावाने ऑक्टोबर 2023 मध्येबनावट कागदपत्र तयार करण्यात आले. त्यांच्या नावावर 7 लाखांचे लोन मंजूर झाले असताना आरोपींनी त्यांच्या अकाउंटवर फक्त 2 लाख 37 हजार रुपये एवढीच रक्कम जमा केली. उर्वरित 4 लाख 63 हजार रुपये त्यांच्या संमतीशिवाय इतर ठिकाणी भरण्यात आले. आरोपींनी फक्त त्यांचीच नव्हे तर या पद्धतीने इतरही अनेक लोकांची फसवणूक केली आहे.

याप्रकरणी डुग्गीपार पोलिस ठाण्यात आरोपींवर भादंविच्या कलम 406, 420, 467, 468, 471, 120 (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक यांनी या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेतले. तसेच क्रेडिट कार्डच्या नावावर जिल्ह्यातील लोकांची मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक फसवणूकीचा मुद्दाही त्यांनी लक्षात घेतला. त्यानंतर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना तत्काळ जेरबंद करण्याचे पोलिसांनी निर्देश दिले. पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, सायबर सेलच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत आरोपींचा शोध घेतला आणि त्यांना अटक केली.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.