AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 रुपयांच्या फ्रुटीचा मोह नडला… साडेआठ कोटींचा ‘तिला’ बसला फटका; त्या दिवशी नेमकं काय झालं ?

चोरीच्या गुन्ह्यात यश आल्याने मनदीप कौर उर्फ ​​मोना ही हेमकुंड साहिब येथे दर्शनासाठी गेली होती. मात्र तिच्या एका चुकीने ती पकडली गेली.

10 रुपयांच्या फ्रुटीचा मोह नडला... साडेआठ कोटींचा 'तिला' बसला फटका; त्या दिवशी नेमकं काय झालं ?
| Updated on: Jun 19, 2023 | 10:54 AM
Share

Crime news : गुन्हेगार (criminal) कितीही हुशार असला तरी काही ना काही चूक करतोच… आणि कधी ना कधी पकडला जातोच ! अशीच एक चूक पंजाबमधील एका गुन्हेगाराला नडली. तब्बल 8 कोटींची रक्कम लुटणारी ही चोर (theft) अवघ्या एका फ्रुटीमुळे पकडली गेल्याची ही घटना आहे. पंजाबच्या लुधियानामध्ये 8 कोटींच्या चोरीची सूत्रधार ‘डाकू हसिना’ मनदीप कौर उर्फ ​​मोना हिला पंजाब पोलिसांनी पकडले आहे. ती उत्तराखंडमधील चमोली येथील हेमकुंड साहिब येथे दर्शनासाठी गेली होती. तिचा नवराही तिथे होता. याप्रकरणातील 5 आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. आता मुख्य सूत्रधारासह एकूण 9 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5 कोटी 96 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

पोलिस आयुक्त मनदीप सिंग सिद्धू यांनी सांगितले की, मनदीप फर्फ मोन आणि तिचा पती दोघेही नेपाळमार्गे परदेशात पळून जाऊ शकतात, अशी माहिती मिळाली होती, परंतु लुकआउट नोटीस जारी झाल्याने ते पळून जाण्यात यशस्वी झाले नाहीत. त्यांच्याकडून २१ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यांचा आणखी एक साथीदार गौरव उर्फ ​​गुलशन यालाही गिद्दरबाहातून अटक करण्यात आली. आतापर्यंत एकूण नऊ आरोपींना अटक करण्यात आली असून 8 कोटी 49 लाख रुपयांपैकी 5.96 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

10 रुपयांच्या फ्रुटीमुळे ती पकडली गेली

कॅश व्हॅनची चोरी करून फरार झालेला मनदीप कौन उर्फ ​​मोना ही हेमकुंड साहिब येथे दर्शनासाठी गेली होती. तिच्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी मोनाला पकडण्यासाठी फ्री फ्रुटीचे जाळे पसरवत सापळा रचला होता. ही फ्रूटी घेण्यासाठी मोना थांबली आणि पकडली गेली.

या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलिस म्हणाले की, कॅश व्हॅन चोरण्याची योजना यशस्वी झाल्यावर मोना ही पती जसविंदर सिंगसोबत हेमकुंडला गेली होती. मात्र हेमकुंडहून परतत असताना दोघांना पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हेमकुंडहून केदारनाथ आणि हरिद्वारला जाण्याचेही त्यांचा प्लान होता.

नेमकं काय झालं होतं ?

10 जून रोजी रात्री 1.30 च्या सुमारास लुधियानाच्या न्यू राजगुरू नगर भागात सशस्त्र लोकांनी सीएमएस सिक्युरिटीजची कॅश व्हॅन चोरली होती. व्हॅनमध्ये 8 कोटी 49 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. लुधियानापासून २० किमी अंतरावर असलेल्या मुल्लानपूर गावात पोलिसांना कॅश व्हॅन पडक्या अवस्थेत सापडली. त्यातून पोलिसांनी धारदार शस्त्रे आणि दोन पिस्तुलेही जप्त केली.

यानंतर आरोपींना पकडण्यासाठी लुधियाना पोलिसांनी सायबर टीमची मदत घेऊन जीपीएस व्हॅनचा माग काढला आणि परिसरातील मोबाइल टॉवरचा तपशीलही काढला. यातून या पथकाला एक आघाडी मिळाली आणि चोरीत सहभागी असलेल्या 5 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 5 कोटी रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली आहे.

मात्र, या चोरीचे मास्टर माईंड मनदीप कौर ऊर्फ मोना आणि तिच्या पतीसह पाच जण फरार झाले होते. पोलिसांना मोनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सापडला होता. चोरीच्या घटनेनंतर पोलीस त्यांच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवून होते आणि त्यानंतर मोनाला तिच्या पतीसह अटक करण्यात आली.

सीएमएस मध्ये काम करणाऱ्याही होता समावेश

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएमएस कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीचाही या घोटाळ्यात सहभाग आहे. तो तेथे चार वर्षे काम करत होता, त्यामुळे त्याला पूर्ण माहिती होती. लुटूच्या रात्री या चोरांनी मागील दाराने इमारतीत प्रवेश करून व्हॅन लुटली.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.