ड्रोनच्या घिरट्यांसाठी परवानगी आवश्यकच, कोणत्या शहरात पोलीस आयुक्तांनी हा निर्णय कायम केला ?
नाशिक शहर हद्दीत असलेल्या दोन अतिसंवेदनशिल भागात महिनाभराच्या अंतराने ड्रोन उडवल्याची बाब समोर आली होती, त्याचा दोन महीने उलटूनही अद्यापह शोध लागलेला नाही.
नाशिक : शहर पोलीस हद्दीत मागील काही महिन्यांपूर्वी दोन अतिसंवेदनशील परिसरात अज्ञात व्यक्तीने ड्रोन उडवला होता. घुसखोरीप्रकरणाचा सुगावा दोन महिन्यानंतरही न लागल्याने नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी कठोर निर्णय घेतला आहे. पोलीस आयुक्तालायच्या हद्दीत असलेल्या ड्रोन चालक-मालक यांच्यावर कठोर निर्बंध लावले होते. यामध्ये ड्रोन चालक-मालक यांनी ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतात त्यांनी तिथे ड्रोन सील करून जमा करायचा होता. जर ड्रोन उडवायचा असल्यास पोलीस कर्मचाऱ्याच्या देखरेखीखाली उडवायचा असून त्यासाठीही पोलीस आयुक्तांची परवानगी घेणे गरजेचे होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस आयुक्तांनी ड्रोन बाबत हा कठोर निर्णय घेतला होता. या निर्णयाचा ड्रोन चालक-मालक यांना फटका बसला होता, त्याबाबत नाराजी व्यक्त केली जात होती असे असतांना मात्र आता कुठेही ड्रोन उडवायचा असेल तर परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.
नाशिक शहर हद्दीत असलेल्या दोन अतिसंवेदनशिल भागात महिनाभराच्या अंतराने ड्रोन उडवल्याची बाब समोर आली होती, त्याचा दोन महीनेउलटूनही अद्यापह शोध लागलेला नाही.
याबाबत नाशिक पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ पातळीवर बैठक सुरू करत चौकशी सुरू केली होती. त्यावरून विशेष पथकाद्वारे तपास केला जात आहे.
यावरून पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी ड्रोनचालक-मालकांवर कठोर निर्बंध लादत ड्रोन पोलीस ठाण्यांमध्ये जमा केले होते.
यासंदर्भातील पोलीस आयुक्तांनी निर्बंध हटविल्याने ड्रोनचालक-मालकांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी लग्नसराई असो कोणत्याही ठिकाणी ड्रोन उडविण्यासाठी परवानगी बंधनकारक केली आहे.
महिनाभरापूर्वी, पोलीस आयुक्तालय हद्दीत असलेल्या अतिसंवेदनशील परिसर गांधीनगर येथील लष्करीची हद्द येथे ड्रोन घिरट्या घालत असल्याचे समोर आले होते.
तर दुसरीकडे आडगाव शिवारातील डीआरडीओ या ठिकाणच्या प्रतिबंधित क्षेत्रात अज्ञात ड्रोनने घुसखोरी केली होती.
या दोन्ही घटनेवरून नाशिकच्या उपनगर आणि आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हेही दाखल असून अद्यापही तपास सुरू आहे.