पोलीस आयुक्तांचा मोठा निर्णय, आदेशाचे पालन करा अन्यथा…
या आदेशात पोलीस आयुक्तांनी शासकीय, निमशासकीय, लष्करी, एरफोर्स, निमलष्करी दले यांच्या स्वतःच्या मालकीच्या ड्रोन वापरासाठी मुभा दिली आहे.
नाशिक : राष्ट्रीय सुरक्षा प्रश्नी नाशिक पोलीस (Nashik Police) आयुक्तांनी कठोर पाऊले उचलली आहे. नाशिक शहरातील ड्रोनबाबत त्यांनी कठोर आदेश (Drone Order) काढले आहे. नाशिक शहर (Nashik CIty) हद्दीतील सर्व ड्रोन मालक, चालक आणि ऑपरेटर यांना आपले ड्रोन ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहण्यास आहे तिथे जमा करावे लागणार आहे. ड्रोनने चित्रीकरण करायचे असल्यास त्याची परवानगी पोलीस आयुक्त कार्यालयातून घ्यावी लागणार आहे. ती परवानगी ज्या पोलीस ठाण्यात ड्रोन जमा केला आहे. तिथे दाखवून चित्रीकरण करण्यासाठी ड्रोन मिळणार आहे. यावेळी सशुल्क पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली चित्रीकरण करून दिलेल्या मुदतीच्या आत तो ड्रोन सीलबंद करून पोलीस ठाण्यात जमा करावा लागणार आहे. शहरामध्ये दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत लष्करी हद्दीत ड्रोनने घिरट्या घातल्याची बाब घडली होती. त्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून शोध त्याचा शोध सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी कठोर भूमिका घेत मनाई आदेश काढले आहेत.
या आदेशात पोलीस आयुक्तांनी शासकीय, निमशासकीय, लष्करी, एरफोर्स, निमलष्करी दले यांच्या स्वतःच्या मालकीच्या ड्रोन वापरासाठी मुभा दिली आहे.
मात्र यासाठी त्यांना नाशिक शहर आयुक्तालयाच्या नागरी हवाई क्षेत्रामध्ये उड्डाण करण्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन आगाऊ माहिती देणे बंधनकारक केले आहे.
नाशिक शहर परिसराच्या हद्दीत अनेक संरक्षण क्षेत्राशी निगडित केंद्रे आहेत. त्यात गांधीनगर येथील लष्करी कॅट, तोफखाने, हवाई प्रशिक्षण केंद्र, नोट प्रेस, लढाऊ विमानांचा ओझर येथे कारखाना, हवाई दलाची केंद्र आहेत.
हे सर्व केंद्र संवेदनशील असल्याने नो फ्लाईग झोन यापूर्वीच लागू करण्यात आला आहे. तरी देखील सर्रास पणे ड्रोनचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यातच धक्कादाक बाब म्हणजे लष्करी हद्दीत महिन्याच्या अंतरावर ड्रोनने घिरट्या घातल्याची बाब समोर आल्याने कट – कारस्थानाचा संशय पोलिसांना आहे.
त्याच पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी ड्रोनबाबत मनाई आदेश काढत कठोर भूमिका घेतली आहे त्याच तातडीने पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.