एकाच महिलेवर दोघांचा जीव जडला, त्यातून दोन्ही पुरुषांमध्ये सतत वाद सुरू होता, नंतर जे काही समोर आलं ते धक्कादायक होतं
एकाच महिलेवरुन दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. त्यामध्ये प्रमोद निकाळजे याचा खून झाला आहे. यामध्ये प्रमोदचा मित्र आणि सहकारी यांना संशयित म्हणून ओझर पोलिसांनी अटक केली आहे.
ओझर, नाशिक : नाशिकच्या ओझर येथे एका 32 वर्षीय प्रमोद निकाळजे या युवकाची हत्या झाल्याची बाब उघडकीस आली होती. सुरुवातीला या हत्येचे कारण हे किरकोळ वाद असावे असा संशय पोलिसांना होता. प्रमोद निकाळजे या तरुणांची हत्या ही धारधार हत्याराणे करण्यात आली होती. यावरुण ओझर पोलिसांनी गुन्ह्यांची नोंद करून तपास सुरू केला होता. तपास करत असतांना ओझर पोलीसांनी प्रेम प्रकरणाची बाजू देखील तपासण्यास सुरुवात केली. आणि हीच बाब प्रमोदच्या हत्येचं कारण ठरली आहे. दोन व्यक्तींचा एकाच महिलेवर जीव जडलेला असल्याने दोघांमध्ये सातत्याने वाद सुरू होते, एक दिवस वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाल्याचे समोर आले असून त्यामध्ये प्रमोद दत्तू निकाळजे या 32 वर्षीय युवकाची हत्या झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये ओझर पोलीसांनी जयेश देवराम भंडारे, रावसाहेब उर्फ संदिप मधुकर बनसोडे या दोघांना तपासासाठी अटक केली आहे. तब्बल पाच दिवसांनी पोलिसांना संशयित हाती लागले आहेत.
ओझर येथील आंबेडकर नगर परिसरात राहणाऱ्या दत्तू निकाळजे आणि त्याच्या ओळखीतील व्यक्तिचे एकाच महिलेवर जीव जडलेला होता.
एकाच महिलेवरुन दोघांमध्ये सातत्याने वाद होत होता. त्यामध्ये प्रमोद निकाळजे याचा खून झाला आहे. यामध्ये प्रमोदचा मित्र आणि सहकारी यांना संशयित म्हणून ओझर पोलिसांनी अटक केली आहे.
सुरुवातीला प्रमोदच्या मृत्यूचे कारण लक्षात येत नसल्याने पोलीसांनी परिसरात तपास सुरू केला होता, यामध्ये प्रमोदची शेवटची भेट कुणासोबत झाली होती, कोण-कोण त्याच्यासोबत होते.
प्रमोद कुणा-कुणाला भेटत होता ही माहिती समोर आल्यानंतर प्रमोदच्या हत्येचा उलगडा झाला आहे. यामध्ये प्रमोद प्रेम संबंधात आडवा येत असल्याने त्याची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
जयेश भंडारे आणि प्रमोद निकाळजे या दोघांचे एकाच महिलेसोबत प्रेमसंबंध होते. त्यात जयेश ह्याने मित्र संदिप बनसोडेच्या मदतीने प्रेमसंबंधात अडसर ठरणार नाही यासाठी प्रमोदची हत्या केल्याची बाब उघडकीस आली आहे.