Pooja Chavan case : 18 दिवसात 18 योगायोग आणि 18 विसंगती!

पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan case) मृत्यूला 18 दिवस झाले आहेत. मात्र तपास जर बघितला, तर त्यात या 18 दिवसात 18 योगायोग आणि 18 विसंगती सुद्धा समोर आल्या आहेत.

Pooja Chavan case : 18 दिवसात 18 योगायोग आणि 18 विसंगती!
POOJA CHAVAN
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 12:58 PM

मुंबई : पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan case) मृत्यूला 18 दिवस झाले आहेत. मात्र तपास जर बघितला, तर त्यात या 18 दिवसात 18 योगायोग आणि 18 विसंगती सुद्धा समोर आल्या आहेत. एखाद्या मर्डर मिस्ट्री सिनेमालाही लाजवतील, अशा या विसंगती आहेत. शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड (Maharashtra Minister Sanjay Rathod) यांच्याविरोधात भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत त्यांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे. दरम्यान या 18 दिवसात काय योगायोग घडला त्यावर एक नजर टाकू (Pooja Chavan case 18 days 18 coincidences minister Sanjay Rathod)

पूजा चव्हाण प्रकरणात ज्यांचं नाव पुढे आलं, ते वनमंत्री संजय राठोड 10 दिवस नॉट रिचेबल होतात

जो कथित मंत्री आणि पूजाच्या संवादातला दुवा आहे, तो कुटुंबासह बेपत्ता होतो

ज्या पूजाच्या मोबाईलबाबत मंत्र्याला धडकी भरते, तो मोबाईल गायब होतो

या प्रकरणातला महत्वाचा व्यक्ती असलेल्या अरुण राठोडच्या घरी अचानक चोरी होते

चोरीत अरुणचा मोबाईल आणि लॅपटॉप सुद्धा पळवला जातो

जो पूजाचा मोबाईलसारखा महत्वाचा पुरावा गायब करण्याचा प्रयत्न करतो, त्याच अरुणला पुणे पोलीस जबाब घेऊन सोडून देतात

जबाब घेतल्यानंतर अरुण नेमका कुठे आहे, याचा आजपर्यंत कुणालाच पत्ता लागत नाही

इतक्या संवेदनशील प्रकरणावर गृहमंत्री अनिल देशमुख तब्बल ९ दिवसानंतर बोलतात

अरुण राठोडचे गावकरी पूजा आणि अरुणला मित्र मानतात

पूजा आणि अरुण राठोडच्या प्रेमप्रकरणाचेही दावे होतात

मात्र पूजाचे वडीलच अरुण राठोडला ओळखत नाहीत

पहिल्या दिवशी पूजाच्या मृत्यूची चौकशीची मागणी धरणारे तिचे वडील चौथ्या दिवशी तक्रार मागे घेतात

मृत्यूच्या बरोबर एक दिवसआधीच पूजा अरुण राठोडवर यवतमाळमध्ये उपचार होतात

पूजा अरुण राठोड जी ट्रिटमेंट घेते, नेमक्या त्याच ट्रिटमेंटबाबत अरुण आणि कथित मंत्र्यामध्ये संवाद होतो

पूजावर उपचार करणारा तोच यवतमाळचा डॉक्टर बरोब्बर पूजाच्या मृत्यूनंतर गायब होतो

जे पूजाला ओळखत नसल्याचा दावा करतात, त्यांच्यासोबतच पूजाचे ढिगानं फोटो निघतात

पूजाचे वडील तक्रार मागे घेतात, मात्र तिचे आजोबा चौकशीचा आग्रह धरतात

व्हायरल ऑडिओ क्लिप्सवरुन कथित मंत्र्यावर एकही सत्ताधारी नेता बोलत नाही

संशयास्पद मृत्यूची मोठी शक्यता असूनही पुणे पोलीस पूजाची आकस्मिक मृत्यूची नोंद करतात

VIDEO – 18 दिवसात 18 योगायोग

राजीनाम्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही 

शिवसेना नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही असा पवित्रा भाजपने घेतला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात, संजय राठोड हे दोषी आहेत, अशा थेट आरोप भाजपने केला आहे. त्यामुळेच संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

(Pooja Chavan case 18 days 18 coincidences minister Sanjay Rathod)

संबंधित बातम्या 

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक

आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.