#क्राईम_किस्से : The Poonia murders | आमदार पित्यासह कुटुंबातील आठ जणांची हत्या, 2001 मधील गाजलेलं पुनिया हत्याकांड काय आहे?

पंजाबच्या बरवाला विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन अपक्ष आमदार रेलू राम पुनिया (वय 50), त्यांची दुसरी पत्नी कृष्णा (वय 41) यांच्यासह कुटुंबातील 7 सदस्यांची 23 ऑगस्ट 2001 च्या रात्री लिटणी येथील फार्महाऊसवर हत्या करण्यात आली होती. पुनिया कुटुंबीय झोपेत असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी दांडक्याने प्रहार करुन मुलगी-जावई यांनी जीव घेतल्याचं समोर आलं होतं.

#क्राईम_किस्से : The Poonia murders | आमदार पित्यासह कुटुंबातील आठ जणांची हत्या, 2001 मधील गाजलेलं पुनिया हत्याकांड काय आहे?
आरोपी मुलगी सोनिया आणि संजीव
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 7:36 AM

मुंबई : पुनिया हत्याकांड (The Poonia murders) म्हणजेच रेलू राम पुनिया हत्या प्रकरण (Relu Ram Poonia) हे पंजाबमधील राजकीय नेते आणि माजी अपक्ष आमदार रेलू राम पुनिया आणि त्यांच्या कुटुंबातील सात सदस्यांच्या सामूहिक हत्या प्रकरणाशी निगडीत आहे. 23 ऑगस्ट 2001 च्या रात्री रेलू राम पुनियांची सख्खी मुलगी सोनिया आणि तिचा पती संजीवकुमार यांनी संपत्तीच्या वादातून कुटुंबातील सात जणांची डोक्यात लोखंडी दांडक्याने प्रहार करुन निर्घृण हत्या केली होती. मुलगी सोनिया आणि जावई संजीव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, जी नंतर जन्मठेपेत रुपांतरित झाली.

कोणाकोणाची हत्या?

पंजाबच्या बरवाला विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन अपक्ष आमदार रेलू राम पुनिया (वय 50), त्यांची दुसरी पत्नी कृष्णा (वय 41), त्यांची मुलगी प्रियंका (वय 16), पुनियांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा सुनील (वय 23), सून शकुंतला (वय 20), नातू लोकेश (वय 4), नाती शिवानी (वय 2) आणि प्रिती (वय 3 महिने) यांची 23 ऑगस्ट 2001 च्या रात्री पंजाबच्या लिटणी येथील फार्महाऊसवर हत्या करण्यात आली होती. पुनिया कुटुंबीय झोपेत असताना त्यांच्या डोक्यात लोखंडी दांडक्याने प्रहार करुन त्यांचा जीव घेण्यात आला होता. आरोपी सोनिया ही रेलू राम पुनिया आणि त्यांची दुसरी पत्नी कृष्णा यांची मुलगी होती. मुलगी सावत्र भावाच्या कुटुंबासह सोनियाने आपले सख्खे आई-वडील आणि बहिणीचीही हत्या केली होती.

बंगल्याच्या विविध मजल्यावर कुटुंबीयांचे मृतदेह

सकाळी लोकेशला स्कूल बसमध्ये सोडण्यासाठी त्यांचा नोकर आला असता, दोन मजली बंगल्यात विविध ठिकाणी पुनिया कुटुंबीयांचे मृतदेह आढळले होते. सून शकुंतलाचे हात बांधले गेले होते, मात्र या व्यतिरिक्त कुटुंबातील इतर सदस्यांनी प्रतिकार केल्याच्या कोणत्याही खुणा दिसल्या नव्हत्या. त्यानंतर सोनियाने कीटकनाशकाचे सेवन केले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती बेशुद्धावस्थेत आढळली होती. त्यामुळे तिला बरवाला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वडिलांचे आपल्यावर प्रेम नसल्यामुळे आपण त्यांची हत्या केली, अशी चिठ्ठी (सुसाईड नोट) तिच्याकडे सापडली होती. मात्र ती यातून बचावली.

आदल्या रात्री काय घडलं?

आदल्या रात्री सोनियाने धाकटी बहीण प्रियांकाला तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हॉस्टेलमधून फार्महाऊसवर आणले होते. मध्यरात्री फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती. नोकरांनी दावा केल्यानुसार त्यांनी सोनियाला गॅरेजमधून लोखंडी रॉड काढून घेतल्याचे पाहिले होते. नंतर पहाटे 4.45 वाजताच्या सुमारास, सोनिया टाटा सुमोने बंगल्यातून निघाली आणि काही मिनिटांतच परतही आली होती. नोकरांनी पोलिसांना कळवले की त्यांना संशय आहे, सोनियाने तिच्या पतीला घटनास्थळावरुन पळून जाण्यास मदत केली. पोलिसांनी तपास केला असता, कुटुंबाने रात्री जेवणात घेतलेल्या तांदळाची खिरीमध्ये अफूचे अंश सापडले होते.

सावत्र भावाशी जमिनीवरुन वाद

रेलू रामला पहिली पत्नी ओमी देवीपासून सुनील हा मुलगा होता, तर दुसरी पत्नी कृष्णापासून सोनिया आणि प्रियंका (‘पम्मी’) या दोन मुली होत्या. सुनीलचे लग्न शकुंतलाशी झाले होते आणि त्यांना लोकेश हा मुलगा, तर शिवानी आणि प्रीती अशा दोन मुली होत्या. सोनियाचे लग्न संजीवकुमारसोबत झाले होते. रेलू राम आणि त्याची दुसरी पत्नी कृष्णा यांचे संबंध सौहार्दपूर्ण नसल्याची माहिती समोर आली होती. त्याचप्रमाणे, सोनियाचा तिचा सावत्र भाऊ सुनीलसोबत त्यांच्या फार्महाऊसच्या आसपासच्या 46 एकर (19 हेक्टर) शेतजमिनीवरून वाद होते. यामुळे अनेकदा दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली होती आणि खून होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी सोनियाने सुनीलला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकीही दिली होती.

सोनिया-संजीव दोषी

मे 2004 मध्ये सोनिया आणि तिचा पती संजीवकुमार यांना जिल्हा आणि सत्र न्यायालयाने पुनिया आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सात सदस्यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवले. हत्येमागील हेतू सोनिया आणि तिचा सावत्र भाऊ सुनील यांच्यात असलेला संपत्तीचा वाद असल्याचे निष्पन्न झाले. न्यायालयाने दोघांनाही फाशीची शिक्षा सुनावली होती. संजीवकुमारचे वडील, आई आणि भावासह आठ नातेवाईकांना आरोपातून मुक्त करण्यात आले.

सोनिया-संजीव यांची फाशीची शिक्षा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कमी करत जन्मठेप सुनावली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली. भारतीय संविधानाच्या कलम 72 (1) अन्वये त्यांनी राष्ट्रपतींकडे दया याचिका केली होती. या प्रक्रियेदरम्यान हे जोडपे तुरुंगातच होते.

अखेर जन्मठेपेची शिक्षा

तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याद्वारे ही याचिका अनुत्तरित राहिली, पण त्यांचे उत्तराधिकारी आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दोघांची दया याचिका फेटाळली. मात्र दाम्पत्याच्या याचिकेच्या निकालात विलंब झाल्याचे कारण देत पीपल्स युनियन फॉर डेमोक्रेटिक राइट्स (पीयूडीआर) या नागरी हक्क संघटनेने याचिका दाखल केल्यानंतर सोनिया-संजीव यांची फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यात आली, जी सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2014 मध्ये स्वीकारली.

संबंधित बातम्या :

नेपाळच्या शाही राजघराण्यातील 2001 चे हत्याकांड, राजा-राणीसह 9 कुटुंबीयांची हत्या करुन युवराजाची आत्महत्या

आई-वडील, पत्नी-मुलांसह घरातील 14 जणांची हत्या, तरुणाचा गळफास, ठाण्यातील हत्याकांडातून एकमेव महिला बचावलेली

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.