PUBG Murder : ‘हो, मारलं मी माझ्या आईला, फासावरच चढवाल ना? चढवा! तयारीये माझी’

PUBG Murder Case : आईवर गोळ्या झाडून हा मुलगा थांबला नाही. तर त्यानंतर त्यानं आपल्या बापाला फोन लावला. आईची हत्या केल्याची माहिती दिली.

PUBG Murder : 'हो, मारलं मी माझ्या आईला, फासावरच चढवाल ना? चढवा! तयारीये माझी'
हादरवणारी माहिती समोर...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 2:30 PM

‘नाही नाही, असं होऊच शकत नाही!’ असे अशक्य वाटणारे अनेक प्रसंग, घटना समोर येत असतात. त्यापैकी एकच आहे लखनौचं पबजी हत्याकांड (Lucknow Murder Case) . या हत्याकांडप्रकरणी (Murder Case) रोज नवनवे खुलासे होत आहेत. मुलानं आईला गोळ्या घातल्या. रात्री झोपेत पोरानं पिस्तुलातून आईवर गोळ्या झाडल्यानंतर दोन दिवस तो तिच्या मृतदेहासोबतच राहिला. त्यानंतर त्यानं धाकट्या बहिणीलाही सोबत ठेवलं. काऊन्सिंलिंग करणाऱ्यांनी हा मुलगा संवेदनशील असून तो असं कृत्य करु शकत नाही, असं म्हटलं. त्याला कुणीतरी प्रवृत्त केलंय. त्याच्या मनात द्वेष भरवण्यात आला. आईबद्दल (PUBG Murder Lucknow) प्रचंड तिरस्कार निर्माण झाल्यानंतर त्यानं हे कृत्य केलं असल्याचा संशय तपासातून व्यक्त झाला. दरम्यान, आता जी धक्कादायक माहिती समोर आलीय, ती तर सगळ्यांनाच हादरवणारी आहे.

या तिसऱ्या व्यक्तीबद्दल जो संशय व्यक्त केला जात होता, त्याचे धागेदोरे आता सापडू लागलेत. मुलानं आईची हत्या करण्यामागे दुसरं तिसरं कुणीही नाही, तर मास्टरमाईंड हा या मुलाचा बापच होता. तशी कबुलीही या मुलानं दिली आहे. हा सगळ्या घटनाक्रम सांगताना मुलानं जी माहिती उघड केली, ती काळजाचा थरकाप उडवणारी आहे. या मुलानं तर मला फासावर चढवलं तरी मला जराही खेद नाहीये आईच्या हत्येचा असंही म्हटलंय. आपल्या आईच्या हत्येचा या मुलाला जराही खेद न होण्याचं मागणं, फासावरही जाण्यामागी हिंमत होण्यामागचं नेमकं कारण काय? या मागची कारणंही थरकाप उडवणारीच आहेत.

चूक आईची होती?

बाल कल्याण समितीच्या चौकशीत अल्पवयीनं मुलानं खळबळजनक माहिती दिली होती. या मुलाचे वडील सैन्यात असून त्यांचं पोस्टिंग हे पश्चिम बंगलामध्ये होतं. ते घरी नसताना एक प्रॉपर्डी डीलर आईला भेटायला यायचा. हे ना या मुलाला पटत होतं आणि नाही त्याच्या बापाला. यावरुन दोघा पती-पत्नींमध्ये कडाक्याचं भांडणही झालं होतं. या भांडणानंतर आईने मला खूप मारलं, अशी माहिती या मुलानं दिली. याचा प्रचंड राग त्याच्या मनात खदखदत होता. चौकशीत या मुलानं म्हटलंय की….

हे सुद्धा वाचा

एक दिवस प्रॉपर्टी डीलर असणारा हा व्यक्ती घरी जेवायला आला. याचा मला राग आला. मी जेवलो नाही. याबाबत मी बाबांना सांगितलं. हे आईला कळल्यानंतर आईने माझा फोन हिसकावून घेतला आणि मला खूप म्हणजे खूप मारलं. ही गोष्ट जेव्हा मी बाबांना सांगितली, तेव्हा बाबा मला म्हणाले, मी तिथे असतो तर तिला बंदुकीनं गोळ्याच घातल्या असत्या. यानंतर मी बाबांना विचारलं, की मी आता काय करु? त्यावर ते म्हणाले, की जे तुला योग्य वाटतं ते कर. माझं डोकं तर फारच गरम झालं होतं.

राग.. द्वेष आणि मत्सर

मुलानं आईला गोळ्या घालण्याआधी रागाची आणखी एक ठिणगी पडली. एक दिवसस या मुलाच्या आईचे 10 हजार रुपये गायब झाले होते. याचा आळ मुलावर घेत आईने त्याला बेदम मारलं होतं. मुलाच्या मनातील राग आता डोक्यात भिनला होता. त्याच दिवशी त्याला रात्रभर आईने उपाशीही ठेवलं होतं. जेवायला अन्नाचा एक कण आईने न दिल्यानं राग अधिकच वाढला.

आईची मारहाण, तिचं प्रॉपर्टी डिलर असलेल्या माणसाला भेटणं, आईने मारणं, जेवणं न देणं, चोरीचा आळ घेणं, एका पाठोपाठ एक एक गोष्टी कारणीभूत ठरत गेल्या. अखेर एका रात्री आई, मुलगा आणि त्याची लहान बहीण झोपले होते. त्याच रात्री झोपेचं सोंग घेतलेला मुलगा रात्री दोन वाजता उठला. आई आणि बहीण झोपलीये पाहून त्यानं पिस्तुल काढली आणि आईवर गोळ्या झाडल्या.

आधी शिवी दिली आणि मग..

आईवर गोळ्या झाडून हा मुलगा थांबला नाही. तर त्यानंतर त्यानं आपल्या बापाला फोन लावला. आईची हत्या केल्याची माहिती दिली. तेव्हा बापाने मुलाला शिवी देत, ‘अरे *#&@*=^ तुझ्या आईलाच मारलंस तू, पण आता घर खूप शांत झालंय’ असं म्हटलं. खरंतर या मुलाच्या बापाला आधीपासून हे सगळं माहीत होतं. त्यांना याचा रागही येत होते. पण तेव्हा मी काही करु शकलो नव्हतो, असंही या मुलानं म्हटलंय. दरम्यान, या मुलाला बाप नेहमी पाठीशी घालत असल्याचीही माहिती पोलिसांनी याआधी केलेल्या तपासूनतच समोर आलेली होती. आईच्या हत्येनंतर हा मुलगा आपल्या बापासोबत अर्धा तास फोनवर बोलत होता.

दरम्यान, या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर जेव्हा पोलिसांनी मुलाची चौकशी केली होती, त्या दरम्यान, या मुलाला माफ करावं, अशी मागणी करत त्याचे वडील आले होते. मी बायकोला तर गमावलंय, पण आता दोन मुलंच आपल्या जगण्याचा आधार आहेत, असं म्हणत त्यांनी मुलाला माफ करावं, अशी विनंती केली होती. यावरुनही पोलिसांनी संशय व्यक्त केला होता.

लखनौच्या पीजीआय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4 जूनला हे पबजी हत्याकांड घडलं होतं. पबजी खेळायला आईने नकार दिला, म्हणून मुलानं आईची गोळ्या घालून हत्या केल्याचं आधी सांगितलं जात होतं. मात्र त्यानंतर करण्यात आलेल्या तपासातून खळबळजनक माहिती समोर आली असून हे हत्याकांड करण्यासाठी बापानेच मुलाला उकसवलं असल्याचं दिसून आलंय.

आईची हत्या करुन हा मुलगा दोन दिवस मृतदेहासोबत राहिला होता. त्यानंतर आईच्या मृतदेहाचा वास येऊ नये म्हणून तो रुम फ्रेशनर वापरत होता. बहिणीसाठी त्याने जेवणाचाही बंदोबस्त केला होता. या संपूर्ण घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, काऊन्सिलिंग कमिटीनं केलेल्या तपासातून हत्येमागील तिसऱ्या व्यक्तीबाबत झालेल्या खुलाशाने सगळेच हादरलेत.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.