PUBG Murder : पबजी हत्याकांडाचं गूढ वाढलं! ‘आरोपी मुलगा, बहिणीशिवाय हत्येवेळी तिसरीही व्यक्ती घरात होती’

Lucknow Pubg Murder case : आईची हत्या केल्याचा आरोप असणारा मुलगा हट्टी आणि महत्त्वाकांक्षी असला, तरिही तो संवदेनशीलही असल्याचं म्हटलंय.

PUBG Murder : पबजी हत्याकांडाचं गूढ वाढलं! 'आरोपी मुलगा, बहिणीशिवाय हत्येवेळी तिसरीही व्यक्ती घरात होती'
धक्कादायक...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 9:56 AM

लखनौमधील पबजी हत्याकांडप्रकरणी (Pubg murder) आता नवा खुलासा करण्यात आला आहे. या हत्याकांडानंतर पोलिसांनी 16 वर्षांच्या अल्पवयीन आरोपी मुलाची कसून चौकशी केली. या चौकशीत (Lucknow Pubg Murder News) मुलानं खळबळजनक उत्तरंही दिली. त्यानंतर आता या मुलाची काऊन्सिलिंग कमिटीकडूनही चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर आईची हत्या करण्यात आली, त्यावेळी त्या घरात मुलगा आणि त्याच्या बहिणीशिवाय आणखी एक व्यक्ती होती, असा संशय व्यक्त करण्यात आलाय. दोन दिवस आईच्या मृतदेहासोबत राहणं हे कल्पनेच्या पलिकडचं असल्याचं या कमिटीनं मानलंय. तसंच मुलानं हत्या केली असली, तरीही तो आपल्या बहिणीप्रती संवेदनशील असल्याचंही निरीक्षण या कमिटीनं नोंदवलंय. आईच्या हत्येनंतर मुलानं आपल्या बहिणीची काळजी घेतली होती. तिच्यासाठी बाहेर जाऊन जेवणदेखील आणलं होतं.

खरंतर हत्येनंतर तो घरातून पळूनही जाऊ शकला असता, पण त्यानं तसं का केलं नाही? याचाही उलगडा (Murder Mystery) करण्याचा प्रयत्न केला जातोय. दरम्यान, 10 वर्षांची छोटी बहीण आणि हा मुलगा आईच्या हत्येनंतर तिच्या मृतदेहासोबत तीन दिवस एकटेच राहणं, ही बाब सगळ्यांचा चकीत करतेय. यावरुन तर्क वितर्कांना उधाण आलंय. त्यामुळे या हत्येवेळी तिथं तिसरीही व्यक्ती हजर होती, असा संशय घेत पुढील तपास पोलिसांकडून घेतला जातोय.

3 तासांच्या काऊन्सिलिंगमध्ये काय म्हणाला मुलगा?

पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आलेली. तिथं त्याचं काउन्सिलिंग करण्यात आलं. तीन तासांच्या काऊन्सिलिंगमध्ये या मुलाने पोलिसांनी हत्येच्या घटनाक्रमाची खोटी गोष्ट रचली असल्याचं म्हटलंय. त्याने मला काही फरक नाही, असंही या मुलाने काऊन्सिलिंग कमिटीसमोर नमूद केलंय. दरम्यान, ही मुलं ज्यावर विश्वास ठेवून होते, अशी एक व्यक्ती या हत्येवेळी तिथं होतं, असा संशय आता व्यक्त करण्यात आलाय. या व्यक्तीच्या भरवशावरच ही मुलं तीन दिवस आईच्या मृतदेहासोबत राहिली असावीत, अशी शंका कमिटीनं घेतली आहे. पोलिसांनीही त्या अनुशंगाने पुढील तपास आता सुरु केलाय.

हे सुद्धा वाचा

बाल सुधार गृहातील काउन्सिलिंग कमिटीने आईची हत्या केल्याचा आरोप असणारा मुलगा हट्टी आणि महत्त्वाकांक्षी असला, तरिही तो संवदेनशीलही असल्याचं म्हटलंय. आपल्या 10 वर्षांच्या बहिणीप्रती त्याची काळजी दिसून येत होती. तिच्यासाठी तो जेवण घेऊन येणं, तिची काळजी घेणं, अशा गोष्टी हत्येनंतरही करताना दिसला होती. तो जर विकृत मानसिकतेचा असता तर बहिणीची हत्याकरुन पळ काढू शकला असता. कारण या मुलाची बहीण हत्याकांडाची मुख्य साक्षीदार होती. तिनं आपल्या डोळ्यांनी हा सगळा घटनाक्रम पाहिलेला होता.

होय, तिथं तिसरा माणूस होताच?

दोन लहान मुलं तीन दिवस मृतदेहासोबत जगणं समजण्याच्या पलिकडची गोष्ट आहे, असं या कमिटीचं म्हणणंय. दहा वर्षींची मुलगी दोन दिवस मृतदेहासोबत राहणं सोपी गोष्ट नाही. त्यामुळेच या हत्येवेळी तिथं तिसरी व्यक्ती असण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यानंतर पोलिसांनीही आईची हत्या निव्वळ पबजीतून झाली नसणार, हे मान्य केलंय. त्यामुळे या हत्येमागे इतकही काही कारणं असू शकतात, असा संशय आता बळावला आहे.

दुसरीकडे पोलीस कमिश्नर डीके ठाकूर यांनी हत्येच्या तपासप्रकरणी महत्त्वाची माहिती दिलीय. आरोपी मुलानं दिलेल्या माहितीच्या आधारेच सध्या या घटनेबाबत तपास केला जात असून प्रत्येक पैलू पोलीस पडताळून पाहत असल्याचंही त्यांनी म्हटलंय. आता हत्या करण्यात आलेल्या मुलाची आई साधन, मुलगा आणि त्याच्या वडिलांची कॉल हिस्ट्रीही पोलीस काढत आहेत. त्यातूनही अनेक नवे खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काऊन्सिलिंग कमिटीने व्यक्त केलेल्या संशयानं या हत्येचं गूढ आणखी वाढलंय.

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.