Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : पुणे पोलिसांकडून ओळख परेड सुरू असताना गुन्हेगाराने पिळल्या मिशा, त्यानंतर… व्हिडीओ तुफान व्हायरल

पोलिसांना जर अधिकार दिले तर चांगले-चांगले नामचिन गुंडसुद्धा त्यांच्यासमोर गुडघे टेकवतात. हे आपण सिनेमात पाहिलं असेल पण आज पुण्याच तसंच काहीसं घडलेलं पाहाचयला मिळालं. त्यात एकाने हुशारी करण्याचा प्रयत्न केलेला मात्र पोलिसांनी त्याला जाग्यावरच पकडलं.

Video : पुणे पोलिसांकडून ओळख परेड सुरू असताना गुन्हेगाराने पिळल्या मिशा, त्यानंतर... व्हिडीओ तुफान व्हायरल
Pune Police Pared
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 7:01 PM

पुणे : पुणे शहर गुन्हेगारीचा अड्डाच बनत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. पुण्यातील मोठ्या नामचिन गुंडांचे राजकीय पक्षातील नेत्यांसोबत असणारे संबंध असल्याचंही पाहायला मिळालं आहे. पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. नवीन आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यावर पुण्यातील 277 गुन्हेगारांना पोलीस आयुक्तालयामध्ये बोलावत ओळख परेड घेण्यात आली. यामध्ये पुण्यातील प्रसिद्ध टोळ्यांचे म्होरकेसुद्ध हजर होते, यामध्ये गजा मारणे, निलेश घायवळ, बाबा बोडके, बंडू आंदेकर यांचा समावेश होता.

पोलिसांनी सर्व  गुन्हेगारांची ओळख परेड करत त्यांना तंबी दिली. सोशल मीडियाचा वापर करत दहशत पसरवू नये. त्यासोबतच हातात कोयते घेत रील्स बनवून ती शेअर करू नका, अशा सूचना पोलिसांनी सर्वांना दिल्या. पोलिसांकडून ओळख परेड सुरू असताना एका गुन्हेगाराने मिशा पिळल्या. तेव्हा चौकशी करणाऱ्या पोलिसाने ही गोष्ट हेरली. त्याला समोर बोलावलं.

पाहा व्हिडीओ:-

गुन्हेगाराला समोर बोलावत त्यांनी काय करत होता असं विचारलं तेव्हा तो घाबरलेला दिसला. शेवटी त्याने कबुल केलं की आपण मिशा पिळल्याचं हाताने करून दाखवलं. पोलिसांनी त्यावेळी त्याला समज दिली आणि सोडून दिलं. संबंधित गुन्हेगार हा मीडियाचा कॅमेरा समोर आल्यावर मिशा पिळत होता. पोलिसांच्या नजरेपासून तो वाचू शकला नाही. सोशल मीडियावर  व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

आगामी निवडणुकांमुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नवीन आयुक्त अमितेश कुमारांनी आधीच सर्व गुन्हेगारांना दणका दिला. शहरातील पोलीस स्टेशनच्या हद्दीत ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत अशा सर्वांना बोलावून घेतलं. शहरात दहशत पसरवणारे सगळे गुंड हाताची घडी घालून शांतपणे पाहायला मिळाले.

दरम्यान, गेल्या महिन्यात शरद मोहोळ याच्या हत्येने आधीच  गंभीर वातावरण झालं आहे. या हत्येमध्ये मोठ्या गुंडांचा समावेश असल्याने परत एकदा टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र
त्र्यंबकेश्वरमधील प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध, पोलिसात पत्र.
राज्यात शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चा सपाटा; कोकणानंतर आता कुठ खिंडार?
राज्यात शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चा सपाटा; कोकणानंतर आता कुठ खिंडार?.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग, 7 प्रमुख मागण्या काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग, 7 प्रमुख मागण्या काय?.
'सकाळच्या ९ वाजताच्या भोंग्याला..', फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
'सकाळच्या ९ वाजताच्या भोंग्याला..', फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला.
"निर्लज्ज, विश्वासघातकी", गोऱ्हेंच्या आरोपांवरून ठाकरेंची सेना भडकली
भगवं मफलर अन् भगव्या टोपीत धंगेकर, धनुष्यबाण हाती घेण्याआधी NCP ची ऑफर
भगवं मफलर अन् भगव्या टोपीत धंगेकर, धनुष्यबाण हाती घेण्याआधी NCP ची ऑफर.
माणिकराव कोकाटेंना न्यायालयाकडूनदिलासा, धाकधूक कायम; प्रकरण नेमकं काय?
माणिकराव कोकाटेंना न्यायालयाकडूनदिलासा, धाकधूक कायम; प्रकरण नेमकं काय?.
'अन्यथा... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी', अंधारे गोऱ्हेंवर भडकल्या
'अन्यथा... बात निकलेगी तो फिर दूर तलक जाएगी', अंधारे गोऱ्हेंवर भडकल्या.
'12 मर्सिडीज कुठून आणल्या? गोऱ्हे नमकहराम..', ठाकरेंच्या नेत्याची टीका
'12 मर्सिडीज कुठून आणल्या? गोऱ्हे नमकहराम..', ठाकरेंच्या नेत्याची टीका.
'ठाकरे अंतर्वस्त्राचे पैसेही स्वतः देत नाही...', राणेंची जळजळीत टीका
'ठाकरे अंतर्वस्त्राचे पैसेही स्वतः देत नाही...', राणेंची जळजळीत टीका.