Kolhapur Accident : पुढच्यांना वाचवायला गेला आणि मागून बसला जबर फटका!

राज्यातील अपघात सत्र थांबेना! पुणे बंगळुरु महामार्गावर ट्रकचा मोठा अपघात, हायवेवरील वाहतुकीवर परिणाम

Kolhapur Accident : पुढच्यांना वाचवायला गेला आणि मागून बसला जबर फटका!
भीषण अपघातImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 01, 2022 | 4:15 PM

कोल्हापूर : पुणे बंगळुरु महामार्गावर (Pune Bengaluru Highway) दोन ट्रकमध्ये भीषण अपघात (Truck Accident News) झाला. या अपघातामध्ये एक जण ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झालेत. ट्रकने दुसऱ्या एका ट्रकला मागून धडक दिल्यामुळे हा अपघात घडला. कोल्हापूर (Kolhapur Accident News) जवळील उचगाव परिसरात अपघाताची ही घटना घडली.

या अपघातामुळे बराच वेळ महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला होता. लांबच लांब वाहनांच्या रांग या अपघातामुळे लागल्या होत्या. पोलिसांनी प्रयत्नांची शर्थ करुन अखेर खोळंबलेली वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी यावेळी प्रयत्न केले. अपघातातील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नेमका कशामुळे घडला अपघात?

कोल्हापूरच्या उचगाव इथं पुणे बंगळुरु हायवेवरुन काही जण रस्ता ओलांडत होते. यासाठी हायवेरुन जाणारा एका ट्रकने ब्रेक दाबला आणि वाहन थांबवलं. पण या ट्रकमागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकच्या चालकाला वेग नियंत्रित करता आला नाही आणि अनर्थ घडला.

हे सुद्धा वाचा

समोरच्यांना वाचवण्याच्या नादात ट्रकला मागून जबर फटका बसला. मागून येणारा ट्रक समोरील ट्रकवर जोरात आदळला. ही धडक इतकी भीषण होती, की ट्रकच्या समोरच्या बाजूला अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली होती.

मागून धडक दिलेल्या ट्रकमधील चार जणांपैकी एकाचा जागीच जीव गेला. तर तीन जण गंभीररीत्या जखमी झाले. यातील जखमींना कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांनी स्थानिक बचाव यंत्रणांची मदत घेतली. त्यानंतर क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त ट्रक बाजूला हटवण्यात आला. पण हे काम करत असताना हायवेवरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे हायवेवर लांबच लांब रांगा हायवेवर लागल्याचं पाहायला मिळालं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.