सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली, कोरोना काळात पुण्यातील धक्कादायक प्रकार

पुण्यात एका सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 बाईकची रॅली काढण्याचं आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले.

सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली, कोरोना काळात पुण्यातील धक्कादायक प्रकार
सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:51 AM

पुणे : पुण्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर आणि पोलिसांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवाचं रान केलं जात आहे. अशावेळी दुसरीकडे पुण्यात एका सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 बाईकची रॅली काढण्याचं आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कोरोनाचे नियम पायदळी तुडवले गेले. महत्वाची बाब म्हणजे एकीकडे सर्वसामान्य पुणेकरांना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईला समोरं जावं लागत आहे. तर दुसरीकडे मात्र सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. (Large bike rally in Pune at the funeral of criminal Madhav Waghate)

पुण्यातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराची शनिवारी पहाटे हत्या झाली. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्यानं बिबवेवाडी इथं सरोजिनी क्लिनिकसमोर माधव वाघाटे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. माधव वाघाटेवर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी 125 दुचाकींची रॅली काढण्यात आली होती. धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या प्रकरणी 150 ते 200 जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात सिद्धार्थ पलंग, कुणाल चव्हाण, सुनिल खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषिकेश भगत, गणेश फाळके यांच्यासह त्यांच्या साथीदारांचा समावेश आहे.

कोरोना संकटाच्या काळात एका सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला अशाप्रकारची रॅली निघाल्यामुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीबाबत प्रश्न विचारले जात आहेत. दरम्यान, ही रॅली काढल्याबाबत पोलीस उपनिरीक्षक हरिश्चंद्र केंजली यांनी फिर्याद दिली. त्यानंतर 150 ते 200 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव वाघाटेची हत्या

माधव वाघाटे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधव वाघाटे, सुनिल खाटपे, सारंग गवळे हे एकमेकांच्या ओळखीचे होते. शुक्रवारी रात्री सारंग गवळी आणि सुनिल खाटपे यांच्यात व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन वाद झाला होता. गवळी याने कामठे नावाच्या तरुणाचे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवलं होतं. खाटपे आणि कामठे यांच्यात पूर्वीचे वाद होते. त्यामुळे खाटपे याने गवळीला ठेवलेलं स्टेटस काढून टाकण्यास सांगितलं. यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर गवळी तिथून निघून गेला. खाटपे याने वादाची माहिती वाघाटे याला दिली आणि गवळीला धडा शिकवू असं सांगितलं.

वाघाटेवर 8 ते 10 जणांचा हल्ला

माधव वाघाडे खाटपेला भेटण्यासाठी बिबवेवाडी परिसरात आला. त्यावेळी गवळीचे 8 ते 10 साथीदार तिथे आले. त्यांनी वाघाटेवर बांबू, दगड, लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात वाघाटेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेत दोघांना अटक केलीय. अन्य आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती देण्यात आली.

संबंधित बातम्या :

एकतर्फी प्रेमातून 21 वर्षीय तरुणीची हत्या, कुटुंबीय नसताना घरात घुसून चाकूहल्ला

VIDEO | हळद समारंभातच तुफान राडा, दारु पिऊन विरारमध्ये गावकऱ्यांची फ्री स्टाईल हाणामारी

Large bike rally in Pune at the funeral of criminal Madhav Waghate

Non Stop LIVE Update
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.