पुण्यात गुन्हेगाराची हत्या, अंत्ययात्रेला शेकडो बाईक्सची रॅली, 80 समर्थक ताब्यात

माधव वाघाटेवर अंत्यसंस्कार करण्यात्पूर्वी त्याची 125 दुचाकींची रॅली काढून अंत्ययात्रा काढण्यात आली होती (Pune Bike rally Madhav Waghate)

पुण्यात गुन्हेगाराची हत्या, अंत्ययात्रेला शेकडो बाईक्सची रॅली, 80 समर्थक ताब्यात
माधव वाघाटेच्या अंत्ययात्रेला भव्य बाईक रॅली
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:50 AM

पुणे : माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी पुण्यात 125 बाईक्सची रॅली काढण्यात आली होती. यावेळी कोरोना संबंधी नियमावलीचे उल्लंघन केल्यामुळे पुणे पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत बाईक रॅली काढणाऱ्या 80 जणांना ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या 15 पथकांकडून आरोपीची धरपकड सुरु आहे. (Pune Crime Bike rally at the funeral of Criminal Madhav Waghate)

माधव वाघाटे हा पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरवरील सराईत गुन्हेगार होता. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्याने त्याची हत्या केली होती. त्यानंतर शनिवारी दुपारी त्याच्या अंत्ययात्रेत जवळपास 150 ते 200 जणांनी सहभाग घेत दुचाकी रॅली काढली होती. यापैकी 80 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय त्यांच्या दुचाकीही जप्त करण्यात आल्या आहेत.

व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन वादातून हत्या

पुण्यातील माधव वाघाटे या सराईत गुन्हेगाराची शनिवारी पहाटे हत्या झाली होती. व्हॉट्सअॅप स्टेटसवरुन झाल्याने वादानंतर टोळक्यानं बिबवेवाडी इथं सरोजिनी क्लिनिकसमोर माधव वाघाटे याच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत बाईक रॅली

माधव वाघाटेवर अंत्यसंस्कार करण्यात्पूर्वी त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यावेळी 125 दुचाकींची रॅली काढण्यात आली होती. धनकवडी ते कात्रज स्मशानभूमीपर्यंत ही रॅली काढण्यात आली. या प्रकरणी 150 ते 200 जणांविरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात सिद्धार्थ पलंग, कुणाल चव्हाण, सुनिल खाटपे, अमित खाटपे, सौरभ भगत, राजकुमार परदेशी, ऋषिकेश भगत, गणेश फाळके अशा वाघाटेच्या साथीदारांचा समावेश आहे.

कोण होता माधव वाघाटे

माधव वाघाटे हा सराईत गुन्हेगार होता. त्याच्यावर भारती विद्यापीठ, सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्याला तडीपारही करण्यात आलं होतं. (Pune Bike rally Madhav Waghate)

पुणेकरांचा संताप

पुण्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण वाढत आहे. प्रशासकीय पातळीवर आणि पोलिसांकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवाचं रान केलं जात आहे. अशातच सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला 125 बाईकची रॅली काढल्याचं समोर आल्याने संताप व्यक्त केला जात होता. सर्वसामान्य पुणेकरांना कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाईला समोरं जावं लागतं, मात्र सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी गर्दी झाल्याने कारवाईची मागणी होत होती.

पाहा व्हिडीओ

संबंधित बातम्या :

सराईत गुन्हेगाराच्या अंत्यविधीला मोठी बाईक रॅली, कोरोना काळात पुण्यातील धक्कादायक प्रकार

 प्रणिती शिंदेंचे कट्टर समर्थक करण म्हेत्रेंचे निधन, सोलापुरात अंत्यसंस्काराला शेकडोंची गर्दी

(Pune Crime Bike rally at the funeral of Criminal Madhav Waghate)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.