PUNE CRIME NEWS : पुण्यात चोरट्याने देवळातील महत्त्वाची वस्तू पळवली, या कारणामुळे चोरण्यापूर्वी देवाला हात जोडले
PUNE LATEST NEWS : पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्याने देवळातील महत्त्वाची वस्तू चोरली असल्यामुळे परिसरातील सगळ्यांना धक्का बसला आहे.
पुणे : पुण्यात (pune today news) काय घडेल याचा नेम नाही. चोरटे आता देवळात सुध्दा चोरी करायला लागले आहेत. पुण्यातील कोंढवा (pune kondhawa news) भागात एक अजब प्रकार घडला आहे. मंदिरातील घंटा पळवली असल्याचं प्रकार उघडकीस आला आहे. ज्यावेळी ही बातमी परिसरात पसरली. त्यावेळी सगळ्यांना धक्का बसला. हा प्रकार पोलिसांपर्यंत गेला, पोलिसांनी सीसीटिव्ही पाहिल्यानंतर त्यामध्ये आरोपी स्पष्ट दिसत होता. कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरातील (bairavnath temple) घंटा चोरली आहे. ज्यावेळी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने जे कारणं सांगितलं ते ऐकून पोलिसांना सुध्दा धक्का बसला आहे. आरोपीवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची कसून चौकशी सुरु आहे.
सीसीटीव्हीत दिसला चोरीचा प्रकार
पुण्यात ‘चोराने पळवली चक्क मंदिरातील घंटा’, अशी बातमी सगळीकडं व्हायरल झाल्यानंतर परिसरातील लोकांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली होती. काही लोकांनी हा प्रकार पोलिसांच्या कानावर घातला. पोलिसांनी तिथं असलेली सीसीटिव्ही तपासायला सुरुवात केली. त्यावेळी कोंढव्यातील भैरवनाथ मंदिरातील घंटा चोरणारा रिक्षा चालक असल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी सगळीकडं त्याचा तपास सुरु केला.
या कारणामुळे चोरली घंटा
चोरट्याची माहिती मिळाल्यानंतर घंटा चोरणाऱ्या रिक्षा चालकाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले. हा सगळा प्रकार सीसीटिव्हीमुळे उघडकीस आला आहे. ताब्यात घेतलेल्या रिक्षा चालकाने आर्थिक चणचण भासत असल्यामुळे मंदिरातील घंटा चोरली असल्याचं सांगितलं.
देवाला हात जोडले, मग…
ज्यावेळी तो मंदिरात गेला, त्यावेळी त्याने सुरुवातीला हात जोडले आहेत. त्यावेळी त्याची नजर समोर असलेल्या घंटेवरती गेली. घंटा चोरल्यानंतर त्याने ती रिक्षात ठेवली होती. विशेष म्हणजे चोरीची घंटा त्याने चालवण्यासाठी घेतलेल्या रिक्षात ठेवली होती. त्यानंतर पोलिसांनी सगळा प्रकार रिक्षा मालकाच्या कानावर घातला.