Pune Crime News : प्रेयसीला भेटण्यासाठी ‘तो’ बुरखा घालून शाळेत घुसला, मुलं चोरणारा समजून लोकांना बदडलं

तिच्या भेटीसाठी त्याने सरळ बुरखा घातला आणि तो थेट तिच्या शाळेतच जाऊन घुसला. पण त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला. गैरसमजातून लोकांनी त्याला पकडून बदडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं.

Pune Crime News : प्रेयसीला भेटण्यासाठी 'तो' बुरखा घालून शाळेत घुसला, मुलं चोरणारा समजून लोकांना बदडलं
Follow us
| Updated on: Nov 09, 2023 | 12:17 PM

पुणे | 9 नोव्हेंबर 2023 : असं म्हणतात की प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं. माणूस एकदा प्रेमात पडला की पुढचं-मागचं काही बघत नाही की ना कसला विचार करतो. प्रेमातील व्यक्ती कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्यासाठी तयार होतात. एकमेकांना भेटण्यासाठी मजल-दरमजल करायलाही प्रेमवीर तयार होतात. एका भेटीसाठी किंवा फोनसाठी काहीही जुगाड करू शकतात. पण अशावेळेला चुकूनही पकडले गेले तर मात्र उडतो मोठा गोंधळ. प्रेमवीराची अशीच एक भेट फसल्याचा काहीसा प्रकार पुण्यात घडला आहे.

तेथे एक प्रियकर त्याच्या अल्पवयीन प्रेयसीला भेटण्यााठी खूपच उतावीळ झाला होता. एवढा की तिच्या भेटीसाठी त्याने सरळ बुरखा घातला आणि तो थेट तिच्या शाळेतच जाऊन घुसला. पण त्याचा हा डाव त्याच्यावरच उलटला. कारण तो शाळेत घुसताच आसपासच्या लोकांनी त्याला सरळ पकडलं. मुलं चोरणारी टोळी आल्याची अफवा आजूबाजूला पसरली. आणि तो तरूणही त्या टोळीचाच एक मेंबर असल्याच समजून नागरिकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर त्याला पकडून थेट पोलिसांच्याच ताब्यात देण्यात आले. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात ही घटना घडली. विजय अमृत वाघारी असे तरूणाचे नाव असून विश्रांतवाडी पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरूण विजय वाघारी याचे एका अल्पवयीन मुलीवर प्रेम आहे. ती आदर्श इंदिरानगर शाळेत शिकते. दोघेही एकमेकांना भेटायचे, फिरायलाही जायचे. मात्र त्या दोघांच्याही घरच्यांना त्याच्या प्रेमप्रकरणाची कुणकुण लागली. त्यांना हे मान्य नसल्याने दोघांनाही कुटुंबियांनी समज दिली आणि एमकेकांना भेटण्यास बंदी घातली. मात्र प्रेयसीला भेटता येत नसल्याने विजय व्याकूळ झाला.

म्हणून त्याने तिला भेटण्यासाठी एक शक्कल लढवली. त्याने सरळ बुरखा घातला आणि प्रेयसीच्या शाळेत घुसला. पण त्याचा हा प्लान त्याच्याच अंगलट आला आणि उलटला. परिसरातील नागरिक त्याला मुलं चोरणाऱ्या टोळीचा मेंबर समजले आणि पकडून त्याच्यावर हात साफ करत चोपून काढलं. त्यानतंर पोलिसांनी बोलावून ताब्यात दिलं.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.