VIDEO | पुण्यात बांधकामग्रस्त इमारतीचा स्लॅब कोसळला, पाच मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली

या दुर्घटनेने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणच्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज दुर्घटना घडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने पुरवली गेली नव्हती, असे प्रथमदर्शनी आढळून आले आहे.

VIDEO | पुण्यात बांधकामग्रस्त इमारतीचा स्लॅब कोसळला, पाच मजुरांचा जागीच मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली
पुण्यात बांधकामग्रस्त इमारतीचा स्लॅब कोसळून मजुरांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 7:17 AM

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातील शास्त्रीनगरमध्ये बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब (Building Slab) कोसळल्याची घटना घडली आहे. इमारतीच्या स्लॅबच्या जाळ्यांमध्ये अडकून पाच कामगारांचा (Workers) जागीच मृत्यू झाला, तर पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. तसेच इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी कामगार अडकल्याची भीती आहे. त्यांना ढिगाऱ्याखालून काढून प्राण वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरु आहे. ही घटना रात्री उशिरा येरवाड्यातील शास्त्रीनगर चौक वाडिया बंगला गेट नंबर आठ नजीक घडली आहे. या दुर्घटनेत तळमजल्यावरील कामगार ढिगाऱ्याखाली अडकले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. (A building under construction collapsed in Pune, five death 10 injured)

स्लॅब टाकायचे काम सुरु असताना घडली दुर्घटना

गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास वाडीया बंगल्याजवळ ही दुर्घटना घडली आहे. स्लॅबच्या जाळ्यामध्ये अडकलेल्यांपैकी काही जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवले जात आहे. इमारतीचे बांधकाम सुरु असताना स्लॅब टाकायचे काम सुरु होते. घटनेची खबर मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने चार गाड्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि बचावकार्य सुरु केले. तातडीच्या बचावकार्यामुळे काहींच्या जीविताचा धोका टळला. या बचावकार्यामध्ये स्थानिक रहिवाशांनीही पुढे येऊन मदत केली. अनेकांनी अग्निशमन दलाच्या गाड्या येण्याआधी मदतीसाठी तातडीचे प्रयत्न सुरु केले होते. पुणे महापालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी या दुर्घटनेबाबत ट्विट करून घटनेच्या वृत्ताला दुजोरा दिला. अग्निशमन दलाकडून देवदूत पथकासह युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे, असे ट्विट महापौर मोहोळ यांनी केले.

कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्य

महापालिकेच्या जवानांना स्लॅबखाली अडकलेल्या मजुरांना बाहेर काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कामगार स्लॅबच्या लोखंडी गजांखाली अडकले होते. त्यामुळे त्या कामगारांची सुटका करताना अग्निशमन दलाच्या जवानांना कटरच्या साहाय्याने गज कापून मदतकार्याचा मार्ग खुला करावा लागला. यात गंभीर अवस्थेतील काही जखमींची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली. यावेळी जवानांनी एका मागोमाग एक सात कामगारांना बाहेर काढले, मात्र त्या सर्वांचा जागीच मृत्यू झाला होता, अशी माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

दुर्घटनेला जबाबदार लोकांवर गुन्हे दाखल करणार

या दुर्घटनेने बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणच्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज दुर्घटना घडलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने पुरवली गेली नव्हती, असे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

याआधीही पुण्यात अशीच दुर्घटना घडली होती

पुण्यात यापूर्वी 2016 मध्ये अशीच एक दुर्घटना घडली होती. पुण्यातील बालेवाडी येथे बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीचा स्लॅब कोसळला होता. त्यात 9 मजुरांचा मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी झाले होते. जुलै 2016 मध्ये बालेवाडी परिसरात पार्क एक्सप्रेस या 14 मजली इमारतीचं काम सुरु होतं. स्लॅब ठोकण्याचं काम सुरु असताना सकाळच्या सुमारास अचानक स्लॅब कोसळला होता. हा अपघात इतका भयंकर होता की काही मजूर 14 व्या मजल्यावरुन थेट खाली फेकले गेले होते. या दुर्घटनेत 9 मजुरांचा मृत्यू झाला होता.

पाहा व्हिडीओ :

इतर बातम्या

अकोल्यातून लाखो रुपयांच्या बनावट नोटा जप्त; तीन आरोपींना अटक, ‘असा’ झाला भांडाफोड

Yavatmal : यवतमाळमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, व्यावसायिक वादातून हत्या झाल्याचा संशय

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.