डॉक्टरला मारहाण, दवाखान्याची काच फोडली; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

डॉक्टरला झालेल्या मारहाणीमागील कारणाने सर्वांनाच धक्का दिला आहे. कारण जमावाचा राग अगदी किरकोळ कारणावरून अनावर झाला होता. डॉक्टरने दवाखान्याचे दार लवकर उघडले नाही. त्यामुळे पाच जणांची प्रचंड चिडचिड झाली.

डॉक्टरला मारहाण, दवाखान्याची काच फोडली; संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
डॉक्टरला मारहाण, दवाखान्याची काच फोडलीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Sep 10, 2022 | 9:06 PM

बारामती : सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र देशात डॉक्टरांवर हल्ले (Attack on Doctor) होण्याचे सत्र सुरूच आहे. आता महाराष्ट्रातील बारामतीमध्ये एका डॉक्टरला पाच जणांच्या जमावाने मारहाण (Beating) केली. एवढेच नव्हे तर दवाखान्याची काचही फोडली. हा सगळा घटनाक्रम सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. जमावाचा अतिरेक पाहून त्यावर संताप व्यक्त केले जात आहे.

दवाखान्याचे दार लवकर उघडले नाही म्हणून….

डॉक्टरला झालेल्या मारहाणीमागील कारणाने सर्वांनाच धक्का दिला आहे. कारण जमावाचा राग अगदी किरकोळ कारणावरून अनावर झाला होता. डॉक्टरने दवाखान्याचे दार लवकर उघडले नाही. त्यामुळे पाच जणांची प्रचंड चिडचिड झाली.

आरोपींनी डॉक्टरने दरवाजा उघडताच धडा शिकवण्याचे ठरवले. त्यानुसार थोड्या वेळाने डॉक्टरने दरवाजा उघडताच मारहाण करण्यास सुरुवात केली.

हे सुद्धा वाचा

हल्लेखोरांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

बारामती तालुक्यातील सांगवी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी पाच जणांवर माळेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. त्याआधारे पोलिसांनी हल्लेखोरांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सांगवी येथील डॉ. युवराज गायकवाड यांनी त्यांना झालेल्या मारहाणीची आणि जमावाने दवाखान्याच्या केलेल्या तोडफोडीबाबत रीतसर तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पुढील कारवाई सुरु केली आहे.

जेवत असल्यामुळे डॉक्टरने दरवाजा उघडला नाही

6 सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारदार डॉ. युवराज गायकवाड हे आपला साई क्लिनिक हा दवाखाना बंद करुन जेवण करत होते.

यादरम्यान कोणीतरी त्यांच्या दवाखान्याचा दरवाजा ठोठावत होते. मात्र डॉक्टर गायकवाड जेवत असल्यामुळे ते दरवाजा उघडू शकले नव्हते.

डॉक्टरच्या पत्नी आणि मुलालाही मारहाण

दार उघडले जात नसल्याने संबंधित लोकांनी डॉ. गायकवाड यांच्या दवाखान्याच्या खिडकीची काचही फोडली. त्यानंतर जेवण अर्धवट सोडून डॉ. गायकवाड यांनी दवाखान्याचा दरवाजा उघडला.

यावेळी आनंदा उर्फ अनिल संभाजी जगताप, विश्वजीत आनंदा जगताप, भूषण आनंदा जगताप, राजेंद्र शंकर जगताप आणि अशोक शंकर जगताप या पाचजणांनी थेट डॉ. गायकवाड यांना मारहाण करायला सुरुवात केली.

यादरम्यान डॉ. गायकवाड यांचा मुलगा विराजसह पत्नीलाही मारहाण केली. या प्रकरणी डॉ. गायकवाड यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार माळेगाव पोलिसांनी या पाचही जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

न्यायालयाच्या आदेशानंतरही डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा ‘जैसे थे’ असल्यामुळे डॉक्टर संघटनांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.