प्रेमसंबंध तुटल्याने आधी सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली, मग विविध ठिकाणी नेत अत्याचार
आरोपी तुषार करगळ आणि पीडित तरुणी यांचे प्रेमसंबंध होते. यादरम्यान दोघांनी एकत्र सेल्फी फोटो काढले होते. मात्र काही काळाने काही कारणाने त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले.
आंबेगाव : प्रेमप्रकरण तुटल्यानंतर दोघांचा सेल्फी फोटो व्हायरल करण्याची धमकी देत प्रियकराने वारंवार प्रेयसीवर बलात्कार केल्याची घटना पुण्यातील आंबेगावमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन पारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. तुषार पोपट करगळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपी आणि पीडितेचे प्रेमसंबंध होते
आरोपी तुषार करगळ आणि पीडित तरुणी यांचे प्रेमसंबंध होते. यादरम्यान दोघांनी एकत्र सेल्फी फोटो काढले होते. मात्र काही काळाने काही कारणाने त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटले.
फोटो व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार
प्रेमसंबंध तुटल्यानंतर हे सेल्फी फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने तरुणीवर बलात्कार केला. वारंवार धमकी देत तरुणीच्या घरी आणि जुन्नर येथील एका लॉजवर नेत तरुणीवर बलात्कार केला.
पारगाव पोलिसात गुन्हा दाखल
अखेर या अत्याचाराला कंटाळून तरुणीने पारगार पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. तरुणीच्या तक्रारीवरुन पारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
फेब्रुवारी 2020 ते 15 नोव्हेंबर 2022 दरम्यान ही घटना घडली आहे. पुढील तपास पारगाव पोलीस ठाण्याचे सपोनि लहु थाटे यांचे मार्गदर्शनाखाली लोकरे करत आहेत.
नागपूरमध्ये व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार
तरुणीवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ वायरल करण्याची धमकी देत दोन नातेवाईकांनी अत्याचार केल्याची घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. यात पीडित तरुणीच्या बहिणीच्या नवऱ्याचाही समावेश आहे. मोहम्मद अरसलान शेख आणि मोहम्मद सरफराज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.