माहेरी शेजारी राहणाऱ्याशी प्रेम, सासरी पतीचा अडसर, चुलत भावाच्या ‘प्रेमा’साठी पतीचा गेम
प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर (Indapur) तालुक्यात घडला आहे. या खूनात प्रियकराच्या चुलत भावानेही आरोपींना मदत केली. इंदापूर तालुक्यातल्या अकोलेत सोमवारी ही घटना घडली.

भिगवण : प्रेम संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने खून (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर (Indapur) तालुक्यात घडला आहे. या खूनात प्रियकराच्या चुलत भावानेही आरोपींना मदत केली. इंदापूर तालुक्यातल्या अकोलेत सोमवारी ही घटना घडली. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत चोवीस तासांच्या आता दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (a husband has been murdered by his wife’s lover In Indapur)
रक्षाबंधनासाठी माहेरी आली असताना काढला काटा
मयत महेश दत्तात्रय चव्हाण हे आपल्या पत्नीसोबत रक्षाबंधनानिमित्त सासुरवाडीत म्हणजेत अकोलेत आले होते. त्यानंतर २३ ऑगस्टला भालदवाडी-अकोले गावाच्या शिवेवार धारदार शस्त्राने गळ चिरून खून करण्यात आला. या बाबत भिगवण पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याच्या अनुषंगाने मृताची ओळख पटवून भिगवण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. गुन्हा गावाच्या बाहेर निर्जन स्थळी झाला होता. त्यामुळे या ठिकाणी गुन्हा उघडकीस येण्याच्या दृष्टीने काही धारेदोरे किंवा पुरावे नव्हते. तरी भिगवण पोलिसांनी तपास पथक तयार केलं. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपास पूर्ण केला.
पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुल
मयत महेश चव्हाण याच्या पत्नीचे माहेरी गावात घराशेजारी राहणाऱ्या अनिकेत शिंदे याच्याशी पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने पोलिसांनी अनिकेत शिंदे याला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने तोंड उघडलं.
प्रेयसीला भेटता येत नसल्याचा राग
मयत महेश चव्हाण याच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली अनिकेत शिंदेनी पोलीस तपासात दिली. महेशमुळे प्रेयसीला भेटता येत नव्हते, त्यामुळे अनिकेतच्या मनात मयत महेशविषयी प्रचंड राग होता. महेश आणि त्याची पत्नी रक्षाबंधनाला गावी येणार असल्याचं कळल्यानंतर त्याचा संताप अनावर झाला आणि त्याने सासरी आलेल्या महेश चव्हाणचा खून केला.
चोवीस तासांत आरोपी अटक
मृतदेह आढळल्यानंतर चोवीस तासांच्या आता पोलिसांनी वेगाने तपासचक्र फिरवत आरोपी अनिकेत शिंदे आणि त्याचा चुलतभाऊ गणेश शिंदे यांना अटक केली. आरोपींना न्यायालयापुढे हजर केलं असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :