PUNE NEWS | सव्वा वर्षाचा निष्पाप तिचं अनैतिकतेचं पाप कसं धुणार, अनैतिक संबंधात आई राक्षसासारखी वागली
रविवारी दोघांनाही सुट्टी असल्याने विक्रमने तिच्याकडे फिरायला बाहेर जाण्याचा हट्ट केला होता. परंतू विधिलिखित काही विचित्रच होते...
पुणे : विवाह म्हणजे दोन जीवांचे मिलन, साता जन्मांच्या या रेशीमगाठी स्वर्गात बांधल्या जातात असे म्हटले जाते. काही नात्यांमध्ये लग्नाचे नऊ दिवस सरले की मग संसाराचं ओझं पडलं की या नात्याची खरी कसोटी लागते..पती आणि पत्नी संसाराच्या या गाडीच्या दोन चाकांपैकी कधी एक चाक निखळून गेले तर संसाराची पार रयाच जाते, मग दुसरा आधार शोधला जातो. त्यातून आधीच्या नात्याची जबाबदारी सांभाळावीच लागते. अन्यथा हा आधार गळ्याचा कसा फास होतो याचे भयंकर उदाहरण पुण्यात घडलं आहे.
विवाह ही संस्था टीकविण्यासाठी पती आणि पत्नीचे या दोघांची सारखीच जबाबदारी असते. ही नाजूक नाती सांभाळून संसार उभा राहत असतो. पती-पत्नीच्या संसाराच्या वेलीवर जेव्हा एखादं फुल उमलतं तेव्हा हा संसार खरा बहरतो असं म्हटलं जातं. पुण्याच्या चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तिचा संसार बहरला असतानाच पती नाहीसा झाला. संसाराच्या वेलीवरील गोंडस बाळाची जबाबदारी तिच्यावर आली. ती तिने पेलली देखील परंतू मोहाने म्हणा किंवा वय म्हणा तिचे अनैतिक संबंध जुळले. मग काय तिला नवे पंखच फुटले. आणि संसाराच्या वेलीवरचं हे फुल कोमेजू लागले.
बाळ अडथळा ठरू लागला
कामाला जाताना विक्रम कोळेकर या तरूणाबरोबर तिचे संबंध जुळलं आणि मग तो कधीही तिच्या घरी येऊन धडकू लागाला. आपल्याला आधीच्या पतीपासून असलेल्या बाळाकडे तिचं दुर्लक्ष होऊ लागले. मग रोज तो बाळ त्यांच्या प्रेमात मिठाचा खडा वाटू लागला. या मुलाला त्याच्याकडेच पाठवेन अशी धमकी तो देऊ लागला.
रविवारी दोघांनाही सुट्टी असल्याने विक्रमने तिला फिरायला जाण्याचा हट्ट केला. परंतू बाळाला अंघोळ घालायची असल्याचे तिने सांगितले. त्यातून खटके उडाले. ती घरा बाहेर गेल्याचे पाहून विक्रमने तिरमिरीत येऊन रागाच्या भरात अवघ्या सव्वा वर्षांच्या त्या नाजूक बाळाचे हात आणि पाय धरून उचललं आणि बाथरूममध्ये अंघोळीसाठी काढलेल्या उकळत्या पाण्याच्या बकेटमध्ये बुडवले. ते बाळ जीवांच्या आकांताने किंचाळले. आणि विक्रम पळून गेला.
बाळाच्या आईने धावत येऊन त्या कोवळ्या जीवाला उचलून रिक्षाने हॉस्पिटल गाठलं खरं, पण खूपच उशीर झाला होता.. उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत विझली. चाकण पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून विक्रमचा शोध सुरू आहे. बाळाची आई कपाळाला हात लावून घरी बसली आहे..