Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळीमा; प्रेमसंबंधातून जन्मलेल्या सहा दिवसांच्या बाळाला दरीत फेकले, चौघांविरोधात गुन्हा दाखल

फिर्यादी महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. ती अकरा वर्षाच्या आपल्या मुलीसोबत गोडांबेवाडी येथे राहत होती. या दरम्यान नात्यातीलच सचिन चव्हाण याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. याच काळात महिला गर्भवतीही राहिली. मात्र, सचिन याचे महिलेसोबत राहणे त्याचे भाऊ संजय, नितीन, अजय यांना आवडत नव्हते.

Pune Crime : पुण्यात माणुसकीला काळीमा; प्रेमसंबंधातून जन्मलेल्या सहा दिवसांच्या बाळाला दरीत फेकले, चौघांविरोधात गुन्हा दाखल
crimeImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 12:17 AM

पुणे : माणुसकीला काळीमा फासणारी घटना पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात उघडकीस आली आहे. प्रेमसंबंधातू (Love Affair)न जन्मलेल्या सहा दिवसांच्या बाळाला ताम्हिणी घाटा (Tamhini Ghat)च्या दरीत फेकून दिल्याची क्रूर घटना घडली आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात पौड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी चौघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. संजय गंगाराम चव्हाण, नितीन गंगाराम चव्हाण, अजय गंगाराम चव्हाण, सचिन गंगाराम चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांनी 4 फेब्रुवारी रोजी बाळाला ताम्हिणी घाटातील दरीत फेकले होते. ट्रेकर्सच्या मदतीने बाळाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. (A six-day-old baby born out of love was thrown into a valley in pune, Charges were filed against the four)

प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला दरीत फेकले

फिर्यादी महिलेच्या पहिल्या पतीचे निधन झाले होते. ती अकरा वर्षाच्या आपल्या मुलीसोबत गोडांबेवाडी येथे राहत होती. या दरम्यान नात्यातीलच सचिन चव्हाण याच्याशी तिचे प्रेमसंबंध जुळले. याच काळात महिला गर्भवतीही राहिली. मात्र, सचिन याचे महिलेसोबत राहणे त्याचे भाऊ संजय, नितीन, अजय यांना आवडत नव्हते. दरम्यान, 30 जानेवारीला महिलेची प्रसुती होऊन तिने मुलाला जन्म दिला. त्यानंतर संजय, नितीन, अजय आणि सचिन यांनी 4 फेब्रुवारी रोजी रात्री 11 च्या सुमारास, आपण गावी राहू, असे सांगून संबंधित महिला, तिची मुलगी आणि सहा दिवसांच्या बाळाला आपल्या सोबत नेले. त्यानंतर ताम्हिणी घाटात दरीपुलाजवळ पहाटे पावणे चारच्या सुमारास गाडी थांबवून चौघा भावांनी महिला आणि तिच्या मुलीला गाडीत बसविले. नंतर सहा दिवसाच्या बाळाला ओढून घेतले व गाडीचे सर्व दरवाजे लॉक करून बाळाला दरीत फेकून दिले. याप्रकरणी 27 वर्षीय पीडित महिलेने पौड पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी या चौघांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु आहे.

इतर बातम्या

Nashik Crime : नाशिकमधील देवळा जळीतकांड प्रकरण, पाचही आरोपींना 3 दिवस पोलीस कोठडी

Molestation Case : प्रत्येक स्पर्श वाईट नसतो; विनयभंगाच्या गुन्ह्यात क्रीडा शिक्षकाची निर्दोष सुटका

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.