Pune Murder : खेडमध्ये लग्नाच्या वरातीत दारूवरुन झालेल्या भांडणातून तरुणाची हत्या

कडधे गावात मंगळवारी (दि 24) रोजी एका लग्नाची वरात रात्री सुरू होती. त्यापूर्वी चास तेथील एका बारमध्ये वाद झाला, मात्र भांडणे नको म्हणून त्या ठिकाणी वाद मिटवला आणि हे सहा जण वरातीला निघून गेले. मात्र त्या ठिकाणी ही शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे प्यायला दारूची मागणी केली. नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसून धक्काबुक्की करू लागला.

Pune Murder : खेडमध्ये लग्नाच्या वरातीत दारूवरुन झालेल्या भांडणातून तरुणाची हत्या
खेडमध्ये लग्नाच्या वरातीत दारूवरुन झालेल्या भांडणातून तरुणाची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 26, 2022 | 11:35 PM

खेड : लग्नाच्या वरातीत दारू (Liquor) पिऊन भांडणे केल्याच्या वादा (Dispute)तून कडधे येथे युवकाची हत्या (Murder) झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सहा युवकांनी मिळून मारहाण केल्यानंतर मयत युवकाला चासकमान डाव्या कालव्याच्या वाहत्या पाण्यात फेकून दिले. दोन दिवसानंतर तरुणाचा मृतदेह सापडला. शंकर शांताराम नाईकडे (40 रा कडधे,ता खेड) असे हत्या करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासुदेव बोंबले, पवन बोंबले, स्वप्नील सावंत, निलेश नाईकडे, ऋषिकेश उर्फ लखन नाईकडे, विलास परसुडे अशी सर्व आरोपींची नावे आहेत.

काय आहे प्रकरण ?

कडधे गावात मंगळवारी (दि 24) रोजी एका लग्नाची वरात रात्री सुरू होती. त्यापूर्वी चास तेथील एका बारमध्ये वाद झाला, मात्र भांडणे नको म्हणून त्या ठिकाणी वाद मिटवला आणि हे सहा जण वरातीला निघून गेले. मात्र त्या ठिकाणी ही शंकर नाईकडे आला व त्याने काही युवकांकडे प्यायला दारूची मागणी केली. नंतर नाचणाऱ्या काही युवकांमध्ये घुसून धक्काबुक्की करू लागला. यावरुन बाचाबाची सुरु झाली. नंतर त्याचे मारामारीत रूपांतर झाले. शंकर याला युवकांनी एकत्रितपणे बाजूला नेले. अंधारात त्याच्यावर चहुबाजूंनी जोरदार हल्ला चढवला. दगड, विटांनी डोक्यावर मारहाण केली. मारहाणीनंतर शंकर निपचित पडला. भविष्यात त्रास होऊ शकतो म्हणून त्याला एका वाहनात घालून गावाच्या बाहेरून वाहणाऱ्या चासकमानच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात फेकून दिले, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. दोन दिवसानंतर युवकाचा मृतदेह सापडला. (A young man was killed in a quarrel over alcohol at a wedding in Khed Pune)

हे सुद्धा वाचा

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.