VIDEO : शिरुरमध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे बँक लुटण्याचा प्रयत्न फसला, चोरटे सीसीटीव्हीत कैद

पिंपळे जगताप गावातील चौकात आयडीबीआय बँक आहे. आज पहाटेच्या सुमारास पाच चोरटे या परिसरात घुसले. त्यांनी येथील पाच घरांसह एक दुकान लुटले. त्यानंतर ते शेजारी असलेल्या आयडीबीआय बँकेकडे वळले.

VIDEO : शिरुरमध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे बँक लुटण्याचा प्रयत्न फसला, चोरटे सीसीटीव्हीत कैद
शिरुरमध्ये नागरिकांच्या सतर्कतेमुळे बँक लुटण्याचा प्रयत्न फसलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 10:44 PM

शिरुर : शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथे आयडीबीआय बँक (IDBI Bank) लुटण्याचा चोरट्यांचा प्रयत्न नागरिकांच्या सतर्कतेमुळे फसला आहे. चोरट्यांनी बँकेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. मात्र शेजारीच रहायला असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जाग आल्याने त्याने तात्काळ गावकऱ्यांना फोन करुन जागे केले. गावकरी जागे झाल्याची चाहूल लागताच चोरटे (Thieves) चोरी न करताच तेथून पसार झाले. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV)त चोरटे कैद झाले आहेत. चोरट्यांनी आधी बँकेच्या शेजारी पाच घरांसह एका दुकानामध्ये चोरट्यांनी चोरी केली. मग चोरट्यांनी बँकेकडे आपला मोर्चा वळवला. मात्र गावकऱ्यांमुळे हा प्रयत्न अयशस्वी झाला.

चोरटे बँकेत घुसले मात्र गावकरी जागे झाल्याने त्यांचा प्रयत्न फसला

शिरूर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमधील हे पिंपळे जगताप गाव आहे. येथे परप्रांतीय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत. या गावासह आजूबाजूच्या गावातही चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पिंपळे जगताप गावातील चौकात आयडीबीआय बँक आहे. आज पहाटेच्या सुमारास पाच चोरटे या परिसरात घुसले. त्यांनी येथील पाच घरांसह एक दुकान लुटले. त्यानंतर ते शेजारी असलेल्या आयडीबीआय बँकेकडे वळले. बँकेचा टाळा तोडून त्यांनी आत प्रवेश केला. मात्र टाळे तोडताना बँकेच्या शेजारी राहत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला जाग आली आणि त्याने सर्व गावकऱ्यांना फोन करुन ही याची माहिती दिली. मात्र गावकरी जागे झाल्याची चाहूल चोरट्यांना लागली आणि त्यांनी तात्काळ तेथून पळ काढला. चौकातील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. बँकेची चोरी रोखण्यात ग्रामस्थांना यश आले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. (Bank robbery attempt foiled in Shirur due to vigilance of citizens)

हे सुद्धा वाचा

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.