दुहेरी हत्याकांडातील मारेकरी जंगलात! चाकण पोलिसांची आरोपीला वाशिममधून सिनेस्टाईल अटक

मोठ्या शिताफीने पोलिसांनी लावला दुहेरी हत्याकांडाचा छडा! पुण्यात मर्डर करुन वाशिमच्या जंगलात अंडरग्राऊंड?

दुहेरी हत्याकांडातील मारेकरी जंगलात! चाकण पोलिसांची आरोपीला वाशिममधून सिनेस्टाईल अटक
मुख्य आरोपीला अटकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 9:23 AM

सुनिल थिगळे, TV9 मराठी, पुणे : चाकण पोलिसांनी दुहेरी हत्याकांडाचा (Pune Double Murder) अखेर छडा लावला आहे. चाकणमध्ये दोघांची हत्या (Chakan Murder News) करुन आरोपी वाशिमच्या (Washim Crime News) जंगलात पसार झाला होता. जंगलात लपून बसलेल्या आरोपीचा पोलिसांनी मोठ्या शिताफीने शोध घेत त्याला अटक केली. बिल्डिंगमध्ये येऊ न दिल्याच्या रागातून हे दुहेरी हत्याकांड घडलं असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. वाशिममध्ये चाकण पोलिसांचं पथक जंगलात गेलं आणि तिथूनच मारेकरी असलेल्या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या.

पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतीत सावरदरीगावात भक्ती अपार्टमेंट आहे. या अपार्टमेन्टमध्ये सूरज चव्हाण आणि अनिकेत पवार यांच्याशी प्रदीप दिलीप भगत याचा वाद झाला होता. आपआपसातील वादातून प्रदिप दिलीप भगत (वय 21 वर्ष, रा. सावरदरी, मुळगाव मंगळूरपीर. जि. वाशिम) याने 8 ऑक्टोबरला चाकूच्या सहाय्याने सूरज आणि अनिकेतला भोसकलं आणि त्यांची हत्या केली होती. त्यानंतर आरोपी होंडा शाईन मोटार सायकल वरून पळून गेला.

पाहा लाईव्ह घडामोडी : Video

हे सुद्धा वाचा

या दुहेरी हत्याकांड प्रकरणी महाळुंगे पोलीस चौकीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. चाकण औद्योगीक परिसरात झालेला दुहेरी खूनाची पोलिसांनी गंभीर दखळ घेतली. सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली, युनिट 3 कडील आणि पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड तसंच पोलीस अधिकारी पोलीस अंमलदार यांना तपासकामी सूचना देण्यात आल्या होत्या.

आरोपीचा सुगावा

आरोपीला शोधण्यासाठी वेगवेगळी पथकं तयार करण्यात आली होती. एक पथक घटनास्थळावरील परीसरात सदर आरोपीचे संपर्क असणारे त्याचे नातेवाईक मित्र यांना ताब्यात घेऊ त्यांची चौकशीकरत होतं. आरोपी हा त्याच्या मूळगावी गेला असल्याबाबत माहिती पोलिसांना मिळाली. ही माहीती मिळताच पोलिसांचे एक पथक वाशिम येथे रवाना झालं.

आरोपीचे मूळ गावी गिभा, ता. मंगळूरपीर, जिल्हा वाशिम इथं पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपीच्या रहात्या घराचा शोध घेतला. तिथे आरोपीचा भाऊ निलेश दिलीप भगत (वय 22 वर्ष) आणि आरोपीचा मामेभाऊ रोशन सुरेश इंगवले (वय 23 वर्ष, रा. रूई ता. मानोर, जि.वाशिम) यांना विश्वासात घेतलं. त्यानंतर आरोपी बाबत चौकशी करण्यात आली.

जंगलात सिनेस्टाईल पाठलाग

प्रदिप भगत हा पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास त्याच्या मामाचे गावी रूई ता. मानोर जि. वाशिम इथं राजू वसंत इंगवले यांच्या शेताच्या तांड्यामध्ये लपून बसला होता. पोलिसांना चौकशीतून ही बाब कळल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि मोठ्या शिताफीने आरोपी प्रदीप याला अटक केली.

चाकण पोलिसांनी या ठिकाणी शोध घेत असताना तो तेथील जंगला मध्ये पळून गेला. तपास पथकाने त्याचा स्थानिक पोलिसांच्या मदतीने जंगल परीसरात रात्रभर शोध घेतला. पण आरोपी पोलिसांना चकवा देत होता. मात्र पोलिसांनी जंगलामध्ये शोध सुरूच ठेवून आरोपी प्रदिप दिलीप भगत यास शिताफिने ताब्यात घेतले.

हत्येचं कारण?

आरोपी प्रदीपकडे तपास केला असता मोठा खुलासा या दुहेरी हत्याकांड प्रकरणी झाला. सूरज चव्हाण आणि अनिकेत पवार यांनी त्यांच्या बिल्डींगमध्ये येण्यास विरोध केल्यानं आपण त्यांची हत्या केली, अशी कबुलीदेखील प्रदीपने दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) काकासाहेब डोळे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. प्रशांत अमृतकर, यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उप निरीक्षक गिरीश चामले, यदु आठारी, सचिन मोरे, रूषीकेश भोसुरे, अंकुश लांडे, महेश भालचिम सागर जैनक, योगेश्वर कोळेकर, राजकुमार हनमंते, त्रिनयन बाळसराफ, राहुल सुर्यवंशी, रामदास मेरगळ, सुधिर दांगट, समिर काळे, निखील फापाळे यांनी या दुहेरी हत्याकांडाचा छडा लावला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.