पुण्यात पुन्हा विचित्र अपघात, सुसाट चालकाने अनेक वाहनांना उडवले, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
pune accident : ताथवडे-पुनावळे रस्त्यावर झालेल्या या या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. मात्र यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाकड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

pune accident : पुणे शहरात अधूनमधून अपघाताचे थरार होत असतात. सुसाट वाहनांनी अनेक वाहनांना धडक दिल्याचे प्रकार यापूर्वी पुण्यात घडले आहे. पंधरा दिवसांपूर्वी पुणे शहरातील चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताचा मोठा थरार घडला होता. कंटेनरने अनेक वाहनांना धडक दिली होती. या घटनेत 10 ते 15 जणांना कंटेनरने उडवले आहे. त्यामध्ये एक जणाचा मृत्यू झाला होता. आता पुन्हा पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एक विचित्र अपघात झाला आहे. एका पिकअप चालकाने अनेक वाहनांना उडवले आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीत ही कैद झाला आहे.
अनेक वाहनांना ठोकले
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये शुक्रवारी साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला. ताथवडे-पुनावळे रस्त्यावर घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भरधाव वेगात निघालेल्या पिकअप चालकाने आधी उजव्या बाजूने येणाऱ्या चारचाकी वाहनाला समोरासमोर धडक दिली. या धडकेत पिकअपचे चाक निखळले. त्यानंतर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटला अन पार्क असलेल्या दुचाकीला ही पिकअपने ठोकले.




एक महिला गंभीर जखमी
ताथवडे-पुनावळे रस्त्यावर झालेल्या या या अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. मात्र यात एक महिला गंभीर जखमी झाली आहे. चालक मद्यधुंद अवस्थेत होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. वाकड पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
पुणे शहरातील पिंपरी चिंचवडमधील अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद… pic.twitter.com/8usAXrYPYk
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 31, 2025
16 जानेवारी रोजी पुण्यातील चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताचा मोठा थरार घडला होता. त्यात कंटनेर चालकाने अनेक वाहनांना उडवले होते. 10 ते 15 जण त्या अपघातामध्ये जखमी झाले होते. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये आज पुन्हा त्याच पद्धतीचा अपघात झाला. सुदैवाने यावेळी कोणतीही जीवीत हानी झाली नाही.