धक्कादायक! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पुण्यात जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार

पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर येरवड्यात जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. येरवड्यातील कोतेवस्तीमध्ये ही घटना घडली आहे.

धक्कादायक! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर पुण्यात जमावाचा हल्ला; पोलिसांचा हवेत गोळीबार
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 7:19 AM

पुणे : पुण्यातील येरवडा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर येरवड्यात जमावाकडून हल्ला करण्यात आला आहे. येरवड्यातील कोतेवस्तीमध्ये ही घटना घडली आहे. जमावाने हल्ला केल्यानंतर पोलिसांनी देखील आपल्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. या घटनेमध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी रात्री उशीरा हा प्रकार  घडला आहे.

सराईत गुन्हेगाराकडून नागरिकांना त्रास

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, येरवडा येथील सराईत गुन्हेगार शक्‍ती सिंह  हा परिसरातील नागरिकांना त्रास देत होता. नागरिकांनी त्याच्याविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रार मिळताच पोलीस त्याला पकडण्यासाठी गुरुवारी रात्री कोतेवस्ती परिसरात आले. मात्र आरोपी शक्ती सिंह याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या पथकावर जमावाने अचानक हल्ला केला. अचानक हल्ला झाल्याने पोलीस देखील गोंधळून गेले. पोलिसांनी आपल्या संरक्षणासाठी हवेत गोळीबार केला. जमावाच्या हल्ल्यामध्ये एका अधिकाऱ्यासह अन्य काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत.

…म्हणून झाला पोलिसांवर हल्ला

पोलीस आपल्याला पकडण्यासाठी येत असल्याची माहिती शक्‍ती सिंह याला आधीच होती. त्याने आपल्या समाजातील नागरिकांना पोलिसांविरोधात भडकावले. सिंह याचे ऐकून स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये काही पोलीस जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी हवेत गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर जमाव पांगला व पोलिसांनी अखेर आरोपी शक्‍ती सिंह याला अटक केली.

संबंधित बातम्या

Ulhasnagar : उल्हासनगरचा ‘चांदनी डान्सबार’ अखेर सील, आतापर्यंत तब्बल 80 वेळा झाली होती कारवाई

Delhi Crime: बहिणीच्या प्रियकराची चाकूने भोसकून हत्या; भर बाजारात केले वार

Ichalkaranji : शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.