Chakan Murder : मुलीला जेवणात भाकरी न दिल्याचा राग, सुनेने आवळला सासूच्या गळ्याभोवती फास

तपासात मयत महिलेचा मुलगा सागर आणि सून सुवर्णा हिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिनेच सासूचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली.

Chakan Murder : मुलीला जेवणात भाकरी न दिल्याचा राग, सुनेने आवळला सासूच्या गळ्याभोवती फास
चाकणमध्ये सुनेने केली सासूची हत्याImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 12:41 AM

पुणे : सासूने घरात स्वयंपाक बनविला नाही त्यामुळे मुलीला जेवण मिळाले नाही. या किरकोळ कारणावरून सासू (Mother-in-Law)चा आणि सुने (Daughter-in-law)चा वाद झाला. या वादातून सुनेने नायलॉन दोरीने गळा आवळून सासूची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री चाकण येथे घडली आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा चाकण पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या 12 तासात वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणून सुनेला अटक केली आहे. सुषमा अशोक मुळे (71, रा./पंचवटी सोसायटी, झित्राईमळा, चाकण) असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर सुवर्णा सागर मुळे (32) असे हत्या करणाऱ्या सुनेचे नाव असून चाकण पोलिसांनी तिला अटक केली आहे.

मुलीला दुपारी जेवणात केवळ भात दिल्याने दोघींमध्ये वाद

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासू सुषमा आणि सून सुवर्णा यांच्यात वारंवार किरकोळ कारणावरून वाद होत होते. गुरुवारी दुपारी सून सुवर्णा ही शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीकडे कार्यक्रमासाठी गेली होती. सायंकाळी उशिरा ती घरी आली त्यावेळी तिची मुलगी रडत होती. मुलीला विचारणा केली असता आजीने भाकरी बनवून दिली नाही, फक्त भातच दिल्याचं सांगितले. यावरून सासू-सुनेमध्ये भांडण झाले. दरम्यान, सासू भाकरी करत असताना सुनेने तिला बाजूला सारले. यामध्ये दोघींमध्ये चांगलीच झटापट झाली. एकमेकींना खाली पाडले. राग अनावर झाल्याने सून सुवर्णा हिने घरातील नायलॉन दोरीने मागून गळा आवळला. यामध्ये सासू सुषमा या बेशुद्ध पडल्या. मुलगा सागर हा कामावरुन घरी आला. त्यानंतर तिने पतीला सासू फिट येऊन बेशुद्ध पडल्याचे सांगितले. त्याने आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र आईचा मृत्यू झाला होता.

मुलगा आणि सुनेची कसून चौकशी केली असता हत्या उघड

चाकण पोलिसांना माहिती मिळताच उपनिरीक्षक शेंडकर व इतर रुग्णालयात आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी याबाबत तपास सुरु केला. तपासात मयत महिलेचा मुलगा सागर आणि सून सुवर्णा हिच्याकडे कसून चौकशी केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. तिनेच सासूचा गळा आवळून खून केल्याची कबूली दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश राठोड करत आहेत. (Daughter-in-law strangles mother-in-law in Chakan Pune due to domestic dispute)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.