दर्शनाने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली, सहा दिवसांपासून होती बेपत्ता, अखेर तिचा मृतदेहच सापडला

दत्ता पवार यांची मुलगी दर्शना ही सत्कार घेण्यासाठी ९ जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती घरच्यांच्या संपर्कात होती.

दर्शनाने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली, सहा दिवसांपासून होती बेपत्ता, अखेर तिचा मृतदेहच सापडला
Follow us
| Updated on: Jun 19, 2023 | 10:16 PM

विनय जगताप, प्रतिनिधी, पुणे :  पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आज सकाळच्या सुमारास एका तरुणीचा मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला आहे. त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. मोठ्या घातपाताची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. दर्शना दत्तू पवार असे मृत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तिने नुकतीच एमपीएससीची परीक्षा पास झाली असल्याची माहिती समोर आली आहे. ती हरवल्याची तक्रार १५ जून रोजी नऱ्हे आणि सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती. मात्र आज सकाळी राजगडच्या पायथ्याशी हा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मुलीचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी फिर्याद दिली आहे.

१२ जूनपासून संपर्काबाहेर

दत्ता पवार यांची मुलगी दर्शना ही सत्कार घेण्यासाठी ९ जून रोजी पुण्यातील स्पॉट लाईट अकॅडमी येथे आली होती. ११ जून सायंकाळी चार वाजेपर्यंत ती घरच्यांच्या संपर्कात होती. मात्र १२ जून रोजी दर्शनाला फोन करण्यात आले. मात्र तिने फोन उचलले नाहीत. त्यामुळे कुटुंबीय स्पॉट लाईट अकॅडमी येथे गेले.

हे सुद्धा वाचा

मित्रासोबत फिरायला गेल्याची माहिती

चौकशीनंतर समजले की, दर्शना ही तिचा मित्र राहुल दत्तात्रय हांडोरे हिच्यासोबत सिंहगड आणि राजगड याठिकाणी फिरण्यासाठी गेली आहे. मात्र हे दोघेही संपर्कात नाहीत आणि माघारी देखील आलेले नाहीत. म्हणून त्यांनी सिंहगड रोड पोलिसात मिसिंगची तक्रार दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

सहा दिवसांपूर्वी खून झाला असल्याची शक्यता

वेल्हे तालुक्यात असणाऱ्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या सतीचा माळ या परिसरात हा मृतदेह सापडला आहे. साधारण सहा दिवसांपूर्वी हा खून झाला असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. सापडलेला मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाच्या जवळ काही वस्तू सापडल्या. त्यावरून तरुणीची ओळख पटल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांकडून शोध सुरू

दर्शना ही ही पुण्यात एमपीएससीची तयारी करत होती. परीक्षा ती पासही झाली होती. मात्र आठ दिवसांनंतर अचानक मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वेल्हे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आजच्या घटनेने नेमका खून कुठल्या कारणाने झाला याचा तपास करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. लवकरच या घटनेचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Non Stop LIVE Update
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात
'राऊतांचाच कट जिहाद झालाय, जिहादची भाषा करूनही..',भाजप नेत्याचा घणाघात.
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क
अजित पवार भल्या सकाळी मतदानाला, बारामती काटेवाडीत बजावला मतदानाचा हक्क.
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?
शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या वाहनावर गोळीबार, नेमकं काय झालं?.
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?
विरारमध्ये कॅश कांड, तावडेंनी ५ कोटी वाटले? कोणत्या नेत्यान दिली टीप?.
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
शरयू मोटर्सची चौकशी का झाली? श्रीनिवास पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी.
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?
गोपीचंद पडळकरांनी पैसे वाटले? खळबळजनक आरोप करणारा मनोरूग्ण?.
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल
'हा 'नोट जिहाद' आहे का? पैसा बाटेंगे आणि..',उद्धव ठाकरेंचा खरमरीत सवाल.
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप.
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं..
तावडेंकडून पैसे वाटप, ठाकूरांना कोणी दिली टीप? राऊतांनी थेट सांगितलं...
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल
तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल.