Pimpri Chinchwad crime | पिंपरीत 2 लाखाहून अधिक किमतीचा गुटखा जप्त ; अशी केली कारवाई
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा सामाजिक सुरक्षा विभाग सातत्याने या घटनांवर लक्ष ठेवून आहे. गेल्या सहा महिन्यापासून बेकायदेशीर रित्या विकल्या जाणाऱ्या गुटखा, गांज्या, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे.
पुणे – पुणे सोलापूर मार्गावर 46 लाखांचा गुटखा पकडल्याची घटना ताजी असताना आज पिंपरी पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने तब्बल 2 लाख 95 हजार 699 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. चाकण मधील ठाकरवाडी येथे सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान धर्मराज चौधरी याला अटक करण्यात आली आहे.
सातत्याने होतेय होतेय कारवाई
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा सामाजिक सुरक्षा विभाग सातत्याने या घटनांवर लक्ष ठेवून आहे. गेल्या सहा महिन्यापासून बेकायदेशीर रित्या विकल्या जाणाऱ्या गुटखा, गांज्या, अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. आतापर्यत सामाजिक सुरक्षा विभागाने लाखो रुपयांचा माल हस्तगत केला असून , अनेकांना अटकही केली आहे.
कंटेनरमधून विक्रीसाठी नेताना केली कारवाई
दुसरीकडे सोलापूर महामार्गावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत कंटेनरसह सुमारे 46 लाखांचा गुटखा आणि 20 लाखांचा टेम्पो असा एकूण सत्तर लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी वाहनचालक सामीउल्लाह मुर्जता हुसैन (वय 51, उत्तरप्रदेश ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. टेम्पोमधून गुटखा घेऊन निप्पाणी व विजापूर येथून सोलापूर रोडने फुरसुंगी येथूल गोडावूनकडे जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून ही करावाई करण्यात आली. कारवाई दरम्यान सुमारे 350 पोत्यामधून 46 लाख रूपये किंमतीचा हिरा पानमसाला गुटखा त्यामध्ये आढळून आला. तसेच सुमारे 20 लाख रूपये किंमतीचा टेम्पो या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. हा माल बाजारात दुप्पट किंमतीने विकला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. अन्नसुरक्षा अधिकारी अनिल गवते यांनी घटनास्थळी येऊन पकडलेल्या तंबाखूजन्य पदार्थाची तपासणी केली आहे.
Mumbai Fire | भायखळ्यात मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला भीषण आग