एसपीची फुकट बिर्याणी महागात, पुण्यातील महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत.

एसपीची फुकट बिर्याणी महागात, पुण्यातील महिला डीसीपीच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश
पुण्यातील ऑडिओ क्लीप प्रकरणी चौकशीचे आदेश
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 1:34 PM

पुणे : एसपी हॉटेलची बिर्याणी फुकट खाण्याचा अट्टाहास पुण्यातील महिला डीसीपीच्या अंगलट येण्याची चिन्हं आहेत. “ती ऑडिओ क्लिप मीसुद्धा ऐकली, हा खूप गंभीर प्रकार आहे” अशी प्रतिक्रिया गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गृहमंत्र्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना याबाबतची पूर्ण चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. पोलीस उपायुक्त महिलेने पोलीस कर्मचाऱ्याकडे केलेल्या या फर्माईशीची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. TV9 मराठीने यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे ऑडिओ क्लिप

जवळपास 5 मिनिटाची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

ऑडिओ क्लिप तुम्हीच ऐका

मॅडमच्या पतीला मटण बिर्याणी आवडते तर त्यांना चिकन बिर्याणी. फोनवर ऑर्डर देताना त्या हॉटेल चालकाने पैसे मागितल्यास हद्दीतील पोलीस निरीक्षकाकडे तक्रार करा, असंही त्या आपल्या कर्मचाऱ्याला सांगायला विसरत नाहीत. डीसीपी मॅडमच्या या कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं आहे. भ्रष्टाचार वाढवणाऱ्या या अधिकारी महिलेची खाबुगिरी रोखण्याची आणि चौकशी करण्याची मागणी आता केली जात आहे.

संपूर्ण ऑडिओ क्लिप

महिला डीसीपी-विश्रामबागच्या इथे नॉनव्हेज खूप चांगलं मिळतं असं ती म्हणत होती मला पोलीस कर्मचारी-हो… महिला डीसीपी-कुठे? पोलीस कर्मचारी-ते मॅडम…एसपी बिर्याणीची साजूक तुपातली बिर्याणी महिला डीसीपी-बरं..अजून तेवढंच आहे? पोलीस कर्मचारी-अजून एक मटण थाली म्हणून आहे कोल्हापूरची महिला डीसीपी-बरं..जास्त चांगली कुठे आहे? पोलीस कर्मचारी-साजूक तुपातली मॅडम…एसपी बिर्याणीची मॅडम..त्यांच्याकडे दोन दोन प्रकार आहेत..नल्ली निहारी म्हणून एक प्रकार आहे.. पोलीस कर्मचारी-ऑईली बिलकूल नाही..आणि साजूक तुपातली पण चांगली आहे मॅडम..कलर वगैरे नसतं त्यात..काही नाही महिला डीसीपी-बरं जी एक चांगली असेल ती पाठवून द्याल सोनावणेकडे..जर काय याचा इश्यू असेल तर पीआयला सांगून द्याल मॅडमनं सांगितलं म्हणून..मी बोलू पीआयला पोलीस कर्मचारी-नाही मॅडम करतो मी महिला डीसीपी-नाही पण..त्याच्या हद्दीतलं आहे तर पैसे कशाला द्यायचे आपण..आपल्या हद्दीमध्ये पण पैसे द्यायचे का आपण? पोलीस कर्मचारी-आपण यापूर्वी असं कधी केलं नव्हतं त्यांना..ठीक आहे मॅडम मी सांगतो..पीआयशी बोलतो आणि हे करून घेतो महिला डीसीपी-मग तुम्ही काय करायचे? पोलीस कर्मचारी– आपण कॅशच करायचो मॅडम महिला डीसीपी-पे करून? पोलीस कर्मचारी-हो मॅडम…पे करूनच महिला डीसीपी-तेवढं करेल तो..त्यादिवशी मला बोलत होता एक हॉटेल आहे म्हणून…तेवढं करेल तो..त्याच्यात काय एवढं? पोलीस कर्मचारी-येस मॅडम..मी सांगतो महिला डीसीपी-नाहीतर दुसरं कोणी असेल..किंवा मी सांगते

संबंधित बातम्या :

पुण्यात DCP मॅडमला हवी हॉटेलची मटण बिर्याणी… ती सुद्धा फुकट! कर्मचाऱ्यांचं थेट महासंचालकांना पत्र, ऑडिओ क्लिप व्हायरल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.