पुण्यात निवृत्त एअरफोर्स अधिकारी ‘हॅनी ट्रॅप’च्या जाळ्यात, 50 लाखांची खंडणी मागितली, पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त

कोंढव्यात पनवेलच्या एका व्यावसायिकाला हॅनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडल्याची घटना ताजी असतानाच आता चंदननगर इथल्या एका एअरफोर्समधल्या एका निवृत्त अधिकाऱ्यालाही हॅनी ट्रॅप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि चौघांना अटक केली आहे.

पुण्यात निवृत्त एअरफोर्स अधिकारी 'हॅनी ट्रॅप'च्या जाळ्यात, 50 लाखांची खंडणी मागितली, पोलिसांकडून रॅकेट उद्ध्वस्त
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 19, 2021 | 12:23 PM

पुणे : कोंढव्यात पनवेलच्या एका व्यावसायिकाला हॅनी ट्रॅपमध्ये अडकवून लुबाडल्याची घटना ताजी असतानाच आता चंदननगर इथल्या एका एअरफोर्समधल्या एका निवृत्त अधिकाऱ्यालाही हॅनी ट्रॅप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि चौघांना अटक केली आहे. (Honey trapped and robbed a retired Air Force officer in Pune)

तरूणीकडून प्रेमाचं नाटक

चंदननगर परिसरात राहणारे 59 वर्षीय फिर्यादी एअरफोर्समधून निवृत्त झाले आहेत. ते विमाननगर इथल्या युनियन बँक ऑफ इंडिया इथं गेले असताना आरती चौधरी या तरूणीने त्यांनी फोन केला आणि नोकरीची चौकशी केली. त्यावेळी फिर्यादींनी आपण व्यवसाय करत असून आपल्याकडे नोकरी नसल्याचं सांगितलं. तरीही तरूणीने फिर्यादीशी बोलणं सुरूच ठेवलं. व्हॉट्सअपवर त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांची सर्व माहिती घेऊन त्यांच्याशी प्रेमाचे नाटक केले.

50 लाखांच्या खंडणीची मागणी, 10 लाखांचे चेक घेतले

12 ऑगस्टला या तरूणीने फिर्यादींना नारायणगाव इथं बोलावलं. तिथून ती त्यांना एका ठिकाणी घेऊन गेली आणि त्यांच्याबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी तरूणीचे नातेवाईक तिथे आल्याचं दाखवलं आणि फिर्यादीने आपल्याबरोबर जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवल्याचं खोटं सांगितलं. त्यावर त्यांच्यातल्या एकाने फिर्यादीच्या गळ्याला कुऱ्हाड लावून ठार मारण्याची धमकी दिली. यासोबतच हे प्रकरण मिटवून घेण्यासाठी 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर तडजोडीनंतर फिर्यादीकडून युनियन बँक ऑफ इंडियाचे 10 लाख रूपयांचे चेक जबरदस्तीने लिहून घेतले आणि त्यांना सोडून देण्यात आलं.

चार आरोपींना अटक, महिला आरोपीचा शोध सुरू

हा प्रकार घडल्यानंतर सोमवारी पुन्हा फिर्यादीला आरोपींनी पैशांची मागणी केली. तेव्हा त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. विमानतळ पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली आणि सापळा लावून या प्रकरणातल्या चार आरोपींना अटक केली. या प्रकरणातल्या महिला आरोपीच्या शोधासाठी पथकं रवाना करण्यात आली आहेत.

संबंधित बातम्या :

आधी इन्स्टाग्रामवर ओळख, मग शारीरिक संबंध; हनी ट्रॅप करून व्यावसायिकाला लुटणारी टोळी पुण्यात जेरबंद

मुंबईत सेक्सटॉर्शनचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त, सामान्यांपासून बॉलिवूडचे 100 सेलिब्रिटीज अडकल्याचा अंदाज

पत्नीला सिगरेटचे चटके, अघोरी प्रयोगाने छळ, अखेर पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक गायकवाड पिता-पुत्रांना बेड्या, पोलिसांची मोठी कारवाई

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.