पुण्यात मास्कचा गैरफायदा घेत नवऱ्याचा प्रताप, कडक लॉकडाऊनमध्ये पत्नीची संपत्ती हडपली

मास्कचा उपयोग फसवणुकीसाठी केला जाईल अशी कोणी कल्पनाही केली नसेल. परंतु पुण्यातील कविता जाधव यांच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता मास्कचा गैर उपयोग करून हडपण्याचा प्रयत्न झालाय.

पुण्यात मास्कचा गैरफायदा घेत नवऱ्याचा प्रताप, कडक लॉकडाऊनमध्ये पत्नीची संपत्ती हडपली
अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दोन माजी अध्यक्षांना ईडीचे समन्स, 3.39 कोटींची आर्थिक अनियमितता प्रकरणी नोटीस
Follow us
| Updated on: Jun 24, 2021 | 10:59 PM

पुणे : कोरोनामुळे मास्क घालणं सगळ्यांना बंधनकारक आहे. कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण करणारा मास्क हा जणू आपल्या चेहऱ्याचा एक भाग बनलाय. याच मास्कचा उपयोग फसवणुकीसाठी केला जाईल अशी कोणी कल्पनाही केली नसेल. परंतु पुण्यातील कविता जाधव यांच्या नावावर असलेली सगळी मालमत्ता मास्कचा गैर उपयोग करून हडपण्याचा प्रयत्न झालाय. तोही त्यांच्या पतीकडून (Husband cheat wife using mask in Pune transfer all property to self).

आरोपी पतीने मास्कचा गैरफायदा उठवत पुण्यातील पत्नीच्या नावावर असलेली मालमत्ता स्वतःच्या नावावर केल्यानं पुण्यात या प्रकाराची जोरदार चर्चा आहे. आरोपीने पत्नीच्या ऐवजी दुसऱ्याच महिलेला मास्क घालून पत्नी म्हणून दाखवलं आणि नोंदणी व मुद्रांक कार्यालयात पत्नीची सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर केली. पुणे पोलिसांनी या प्रकरणात तक्रार नोंद करुन तपास सुरू केलाय.

पत्नीच्या नावावरील फ्लॅट, दुकान आणि सामाईक मालमत्ता हडपली

पीडित महिलेचं नाव कविता जाधव, तर आरोपी पतीचं नाव राहुल जाधव असं आहे. हे दोघे पुण्यातील कात्रज भागात राहतात. कविता यांच्या नावावर एक फ्लॅट आणि एक दुकान आहे, तर दोन फ्लॅट हे कविता आणि त्यांचे पती राहुल यांच्या सामायिक मालकीचे आहेत. मागील वर्षी जुलै महिन्यात कडक लॉकडाऊन असताना राहुल जाधव यांनी पत्नीच्या नावावर असलेली ही सगळी मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा डाव आखला.

दुसऱ्याच महिलेला मास्क घालून पत्नी म्हणून सह्या केल्या

आरोपी पतीने पत्नीची मालमत्ता आपल्या नावावर करण्यासाठी एका दुसऱ्याच महिलेला मास्क घालून ते नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात घेऊन गेले. तेथे बायकोची पॉवर ऑफ एटर्नी त्यांनी स्वतःच्या नावावर करुन घेतली. त्यासाठी बायकोची खरी कागदपत्र त्यांनी वापरली. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे नोंदणी आणि मुद्रांक विभागातील कर्मचाऱ्यांकडून कागदपत्रांवर असलेल्या फोटोमधील व्यक्तीच आपल्याकडे नोंद करण्यासाठी आली आहे का? हे पाहिलच गेलं नाही. त्याचाच फायदा आरोपी पतीने घेतला.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केलाय. त्यामुळे आता तपासातच या प्रकरणातील अधिक माहिती पुढे येणार आहे. मात्र, या घटनेच्या निमित्ताने मुंद्राक कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मात्र चांगलाच धडा शिकायला मिळालाय.

हेही वाचा :

पुण्यात व्यापाऱ्याकडून 130 कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा, जीएसटी विभागाकडून अटक, नेमकं काय घडलं?

गुंतवणूकदारांना गंडा, पुण्यातील लंकड रिअ‍ॅलिटी फर्म्सच्या मालकाला अटक

मायलेकाची हत्या करुन पतीची आत्महत्या? तपासाचे अनेक कंगोरे, पुण्यातील हत्याकांडाने पोलीसही चक्रावले

व्हिडीओ पाहा :

Husband cheat wife using mask in Pune transfer all property to self

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....