Pune Crime: पुण्यात ज्वेलरीच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याने दोन महिलांचा दागिन्यांवर डल्ला ; सापळा लावून केली अटकेची कारवाई
महितीच्या आधारे दोघीही पुणे सातारा परिसरात असल्याचे लक्षात त्यानुसार सापळा रचवून दोघीना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची काबुली दिली आहे. या दोघींनीही सांगवी व दत्तवाडी परिसरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. यापूर्वीही या दोघींवर चोरीचे तब्बल 22 गुन्हे नोंद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पुणे – मागील काही महिन्यांमध्ये पुण्यातील (Pune) विविध सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने दागिने चोरी घटना घडताना दिसून येत आहेत. नुकतेच दत्तवाडीतील सराफी पेढीत दागिने खरेदीच्या बहाण्याने येऊन 50 हजारांचे मंगळसूत्र लांबवणाऱ्या दोन महिलांना दत्तवाडी पोलिसांनी (Dattawadi Police)अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी महिलांकडून 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले आहे. संबंधित महिलांनी सराफी पेढीत चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. याबरोबरच महिला चोरी करतानाची घटना प्रकार सीसीटीव्हीमध्ये (CCTV)कैद झाली आहे. ज्योत्स्ना सूरज कछवाय आणि भाग्यश्री चंद्रकांत जेऊर असे टाका करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. दोन्ही आरोपीकडं पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.
अशी केली कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्योत्स्ना सूरज कछवाय आणि भाग्यश्री चंद्रकांत जेऊर या दोघींनीही दत्तवाडी भागातील एका सराफी पेढीतून खरेदीच्या बहाण्याने 50 हजारांचे मंगळसूत्र लांबविले. चोरी केल्यानंतर काही वेळातच सराफा पिढीत चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानुसार पोलिसांमध्ये या घटनेची तक्रार देण्यात आली. तक्रारीनंतर आरोपी महिलां चोरी करतानाचे सिसिटीव्हीही फुटेज तपासले व ते वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले. याचाच फुटेजच्या आधारे ती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी प्रमोद भोसले, पुरुषोत्तम गुन्ला, दयानंद तेलंगे पाटील यांना आरोपी महिला मिळाली. महितीच्या आधारे दोघीही पुणे सातारा परिसरात असल्याचे लक्षात त्यानुसार सापळा रचवून दोघीना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची काबुली दिली आहे. या दोघींनीही सांगवी व दत्तवाडी परिसरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. यापूर्वीही या दोघींवर चोरीचे तब्बल 22 गुन्हे नोंद असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अन्य दुकानातही चोरी
शहरातील गजबजलेल्या परिसरात असलेल्या नामांकित पीएनजी तसेच रांका ज्वेलरीच्या दुकानातही यापूर्वी दिवसाढवळ्या महिलांनी दागिने चोरल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने संबंधित आरोपी महिलेला अटक करत तिच्यावर करावाई केली होती.