Pimpri Chinchwad crime | जीवनसाथी डॉट कॉमवरून लग्नाचे आमिष दाखवत लोणावळ्यातील तरुणीला 14 लाखाला गंडवले

या प्रकरणातील आरोपीने नहुश प्रशांत म्हात्रे या नावाने मॅरेज प्रपोजलसाठी फिर्यादी तरुणीला रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर फिर्यादी तरुणी व आरोपी यांची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने संबंधित तरुणीला लग्न करण्याबाबत विचारणा करीत तिचे स्थळ त्यास पसंत असल्याचे सांगितले.

Pimpri Chinchwad crime | जीवनसाथी डॉट कॉमवरून लग्नाचे आमिष दाखवत लोणावळ्यातील तरुणीला 14 लाखाला गंडवले
cyber crime
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 1:38 PM

पिंपरी – जीवनसाथी डॉट कॉम या वेबसाईटवर खोटं प्रोफाइल तयार करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशीच घटना पिंपरीतील(Pimpri)  लोणावळ्यामध्ये घडली आहे. शहरातील एका अविवाहित नोकरदार मुलीला लग्न करण्याच्या नावाखाली तब्बल 14 लाख 90 हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्याचा (cyber crime)धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ नहुश म्हात्रे उर्फ तन्मय म्हात्रे असे या आरोपीचे नाव आहे. लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवर(website) स्वतःचे खोटे प्रोफाइल बनवून वेगवेगळ्या तरुणींना आर्थिक गंडा घालणाऱ्या या महाठकावर अशाच प्रकारचे तब्बल सात गुन्हे वेगवेगळ्या शहारत नोंदविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीने अश्याच प्रकारे मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पिंपरी आणि पुणे या ठिकाणी दाखल आहेत.

अशी घडली घटना

लोणावळ्यातील फिर्यादी तरुणी ही अविवाहीत आहे. एप्रिल 2021 मध्ये या तरुणीने जीवनसाथी डॉट. कॉम या वेबसाईटवर स्वतःचे प्रोफाईल बनविले होते. तेव्हा या प्रकरणातील आरोपीने नहुश प्रशांत म्हात्रे या नावाने मॅरेज प्रपोजलसाठी फिर्यादी तरुणीला रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर फिर्यादी तरुणी व आरोपी यांची ओळख झाली. त्यानंतर आरोपीने संबंधित तरुणीला लग्न करण्याबाबत विचारणा करीत तिचे स्थळ त्यास पसंत असल्याचे सांगितले. यावर विश्वास ठेवलेल्या तरुणीकडून आरोपीने एप्रिल 2021ते दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी पर्यंत वेळो वेळी फोन करून वेगवेगळी कारणं सांगत तब्बल 14  लाख 90 हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने प्राप्त केले.

शिवीगाळ करीत केली दमदाटी

त्यानंतर संबंधित तरुणीने तिचे पैसे परत देणेबाबत आरोपीला फोन केला असता त्याने या तरुणीला शिवीगाळ करीत दमदाटी केली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांकडून आरोपी आदर्श प्रशांत म्हात्रे उर्फ नहुश म्हात्रे उर्फ तन्मय म्हात्रे याच्याविरुद्ध भादवि कलम 419, 420, 507 , माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 कलम ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाकडून आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास लोणावळा पो. नि. सीताराम डुबल हे करीत आहेत.

Drone Photo | आस्था आणि श्रद्धेचं विराट दर्शन, आंगणेवाडीच्या जत्रेची विहंगम दृश्य

Video | सकाळी-सकाळी ED अधिकारी मलिकांच्या घरी पोहचले, तेव्हा नेमकं काय घडलं ? ऐका…

Photo | ईडी कोठडीत असलेला दाऊदचा भाऊ इकबाल कासकर मेडिकल चेकआपसाठी रुग्णालयात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.