Pune Crime : पुण्यात कथित कोयता गँगचे सत्र सुरूच, जुन्या वादातून वृद्ध जोडप्याला हल्ला

ज्येष्ठ नागरिकावर केलेला हल्ला हा पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. कोयता टोळीतील तरुणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून तक्रारदार सतिश भीमा काळे यांच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती समोर आली आहे.

Pune Crime : पुण्यात कथित कोयता गँगचे सत्र सुरूच, जुन्या वादातून वृद्ध जोडप्याला हल्ला
पुण्यात जुन्या वादातून कोयता गँगकडून जेष्ठ नागरिकावर हल्ला
Follow us
| Updated on: Jan 17, 2023 | 3:53 PM

पुणे : पुणे शहरामध्ये कोयता टोळीची दहशत प्रचंड वाढल्याचे आणखी एका घटनेतून समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून हैदोस घालणार्‍या या टोळीने एका ज्येष्ठ नागरिकाला टार्गेट केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. संबंधित जेष्ठ नागरिक एका मोकळ्या मैदानावर आपला कुटुंबीयांसोबत झोपला होता. त्याचदरम्यान कोयता टोळीने तेथे येऊन कुटुंबीयांवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तक्रारदार ज्येष्ठ नागरिक जखमी झाला असून, तातडीच्या उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेने ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी कोयता टोळीला रोखण्यासाठी कठोर पावले उचलली असून सर्व आरोपींना लवकरच जेरबंद करू, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

जुन्या भांडणाचा राग मनात धरून हल्ला

ज्येष्ठ नागरिकावर केलेला हल्ला हा पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याचे उघड झाले आहे. कोयता टोळीतील तरुणांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून तक्रारदार सतिश भीमा काळे यांच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्याच्या शिवाजीनगर भागातील एका मोकळ्या मैदानावर हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात प्रचंड खळखळ उडाली आहे. सतिश काळे आणि त्यांच्या पत्नी झोपेत असताना कोयता टोळीने त्यांच्यावर हल्ला केला.

हे सुद्धा वाचा

सतिश काळे यांचे काही तरुणांसोबत चार महिन्यापूर्वी किरकोळ कारणातून बाचाबाची झाली होती. या भांडणाचा राग मनात धरत चौघांनी मिळून काल रात्री हल्ला केला. याप्रकरणी दाद्या बगाडे, दिपू शर्मा, तुषार काकडे आणि मोन्या कुचेकर या चौघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात रात्रभर प्रचंड दहशत

शिवाजीनगर परिसरातील मोकळ्या मैदानावर झोपलेल्या ज्येष्ठ नागरिक दांपत्यावर कोयता टोळीने हल्ला केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर संपूर्ण रात्रभर कोयता टोळीची प्रचंड दहशत निर्माण झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सतीश भीमा काळे हे आपल्या पत्नी आणि मुलाबाळासह शिवाजीनगर भागात असलेल्या एका मैदानावर रात्री झोपले होते. याच दरम्यान हातात कोयते घेऊन आलेल्या चौघा हल्लेखोरांनी ज्येष्ठ नागरिक दांपत्यावर प्राणघातक हल्ला केला.

परिसर निर्जन तसेच शांत झाल्याचे पाहून हल्लेखोर कोयता टोळीने झोपेत राहिलेल्या दांपत्यावर हल्ला करण्याची संधी साधली. हल्ल्यानंतर आरोपी हल्लेखोर पसार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके विशेष मेहनत घेत आहेत.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.