AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील भाजप नगरसेवकाच्या हत्येचा कट, भावाला जिंकवण्यासाठी जीवे मारण्याचा प्लॅन

विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीरसागर याला आगामी पुणे महापालिका निवडणुकीत सहज निवडून येता यावे, यासाठी धीरज घाटे यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

पुण्यातील भाजप नगरसेवकाच्या हत्येचा कट, भावाला जिंकवण्यासाठी जीवे मारण्याचा प्लॅन
Dheeraj Ghate
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 7:47 AM
Share

पुणे : पुणे महापालिकेतील भाजप नगरसेवक धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांच्या खुनाचा कट उघड झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आगामी महापालिका निवडणुकीत भावाचा विजय सोपा व्हावा, यासाठी आरोपीने हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील भाजप नगरसेवक धीरज रामचंद्र घाटे (वय 46 वर्ष, रा. स्नेहनगर, वृंदावन) यांची हत्या करण्याचा कट उघड झाला आहे. पुण्यातील विश्रामबाग पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. विकी क्षीरसागर, मनोज पाटोळे आणि महेश आगलावे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी धीरज घाटे यांनीच फिर्याद दिली होती. विकी क्षीरसागर याचा भाऊ राकेश क्षीरसागर याला आगामी पुणे महापालिका निवडणुकीत सहज निवडून येता यावे, यासाठी घाटे यांच्या खुनाचा कट रचल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

कोण आहेत धीरज घाटे?

धीरज घाटे हे पुणे महापालिकेतील कसबा विश्रामबाग वाडा वॉर्ड क्र. 29 मधील भाजप नगरसेवक धीरज घाटेंना आधी पुणे महापालिकेत सभागृह नेता, नंतर पुणे शहर प्रभारी म्हणून भाजपकडून संधी मार्च महिन्यात घाटेंची भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस (सचिव) पदी नियुक्ती परभणी आणि बीडमध्ये चार वर्ष संघाचे प्रचारक म्हणून काम

पाहा व्हिडीओ :

शिवसैनिकांची हत्या

दरम्यान, सोलापुरातील मोहोळमध्ये शिवसैनिकांची दुहेरी हत्या केल्याप्रकरणी पाच जणांना काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. शिवसैनिकांच्या बाईकवर टेम्पो घालून अपघात असल्याचं भासवत हत्या करण्यात आली होती. कर्नाटक राज्यात लपून बसलेल्या 5 संशयित आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आल्या. शिवसैनिक विजय सरवदे आणि सतीश क्षीरसागर यांचा अपघाताच्या आडून खून झाला होता.

संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे आणि संदीप सरवदे अशी आरोपींची नावे आहेत. नगरपरिषदेच्या राजकारणातून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाची हत्या केल्याचा प्रकार 15 जुलै 2021 रोजी समोर आला होता. बाईकने जाणाऱ्या दोघा शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घातल्याने सतीश नारायण क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या विजय सरवदे यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतोष जनार्दन सुरवसे, रोहित उर्फ अनिल फडतरे, पिंटू सुरवसे, टेम्पो चालक भैय्या अस्वले या चौघांच्या विरोधात त्यावेळीच गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी टेम्पो चालक भैय्या अस्वले याला 15 जुलैलाच अटक करण्यात आली होती.

बोगस मतदार नोंदणीच्या तक्रारीचा राग

काही महिन्यांपूर्वी सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 8 आणि 9 मध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या कारणावरून सिद्धार्थ नगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश नारायण क्षीरसागर आणि विजय सरवदे या दोघांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन प्रांताधिकाऱ्यांनी सुनावणी केली होती. त्यानंतर बोगस नावे कमी करण्यात आली होती. याशिवाय, रमाई आवास योजनेच्या 28 मंजूर गायब फाईलींबाबतही शिवसेनेच्या या दोघा कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. या सर्व गोष्टींचा राग मनात धरुन संशयित आरोपीने हे कृत्य केल्याची माहिती आहे.

संबंधित बातम्या :

नांदेडमध्ये नेत्यांच्या हत्येचा कट, लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांना दहा वर्षांचा कारावास

बाईकवर टेम्पो घालून सोलापुरात शिवसैनिकांची हत्या, पाच संशयितांना कर्नाटकातून अटक

नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.