पत्नी आणि सासरचा जाच, लग्नानंतर वर्षभरातच जवानाची आत्महत्या, 24 व्या वर्षी पुण्यात टोकाचं पाऊल
सैन्य दलात कार्यरत 24 वर्षीय गोरख नानाभाऊ शेलार या जवानाने आत्महत्या केली. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून त्याने पुण्यात गळफास घेतल्याचा आरोप आहे.
पुणे : सैन्य दलातील जवानाने आत्महत्या (Soldier Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून जवानाने आयुष्याची अखेर केल्याचा आरोप केला जात आहे. पुणे शहरात (Pune Crime) हा प्रकार घडल्याची माहिती आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी तरुणाने टोकाचं पाऊल उचललं. 6 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री जवानाने गळफास घेतला. गोरख नानाभाऊ शेलार असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट पदावर एएफएमसीमध्ये तो कार्यरत होता. तो पुण्यातील वानवडी भागातील सैनिक आवासमध्ये राहत होता. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जवानाच्या पत्नीसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
सैन्य दलात कार्यरत 24 वर्षीय गोरख नानाभाऊ शेलार या जवानाने आत्महत्या केली. पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून त्याने पुण्यात गळफास घेतल्याचा आरोप आहे. तो सैन्य दलामध्ये नर्सिंग असिस्टंट पदावर एएफएमसीमध्ये तो कार्यरत होता. पुण्यातील वानवडी भागातील सैनिक आवासमध्ये राहत होता.
जवानाच्या भावाचा आरोप काय?
16 फेब्रुवारी 2021 रोजी माझ्या भावाचे लग्न झाले होते. लग्नापासून त्याची पत्नी – अश्विनी युवराज पाटील माझ्या भावाला वारंवार मानसिक त्रास देत होती. तुझी नोकरी घालवतो, गरोदर पत्नीचा गर्भपात करतो. तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर गुन्हा दाखल करतो, नाहीतर सोडचिठ्ठी आणि 15 लाख रुपये दे, असं पत्नीच्या माहेरची माणसं त्याला सांगत असल्याचा आरोप मयत जवानाच्या भावाने केला आहे.
माहेरच्या पाच जणांवर गुन्हा
शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन माझ्या भावाला गळफास घेत आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. त्याच्या मृत्यूला भावाची पत्नी अश्विनी युवराज पाटील, सासरा युवराज पाटील, सासू संगीता पाटील, मेहुणा योगेश पाटील (सर्व रा. नंदाने, ता. जि. धुळे) आणि मावस मेहुणी भाग्यश्री पाटील (रा. शहादा, ता. शहादा, जि. नंदुरबार) हे कारणीभूत आहेत, असा दावाही जवानाच्या भावाने केला.
संबंधित बातम्या :
नागपुरात पतीच्या विरहात पत्नीची आत्महत्या; रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले
वडिलांमुळे आईने आत्महत्या केल्याचा राग, औरंगाबादेत 24 वर्षीय मुलाकडून बापाची हत्या