Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMPML बसच्या चाकासोबत फरफटत गेल्या, पुण्यात 75 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू

पीएमपीएमएल बसखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे वृद्धा काही अंतर फरफटत गेली. या अपघातात पद्मा पंढरीनाथ गायकवाड या 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला.

PMPML बसच्या चाकासोबत फरफटत गेल्या, पुण्यात 75 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू
पुण्यात पीएमपीएमएल बसखाली चिरडून वृद्धेचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 10:29 AM

पुणे : पीएमपीएमएल बसखाली (PMPML Bus Accident) येऊन वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. बसच्या चाकाखाली आल्यामुळे महिलेला प्राण गमवावे लागले. पुण्यात (Pune Crime) हा दुर्दैवी अपघात झाला. पादचारी महिला रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. यामध्ये 75 वर्षीय महिलेचा मृत्यू (Old Lady Death) झाला. पद्मा पंढरीनाथ गायकवाड असं मयत महिलेचं नाव आहे. पुण्यातील विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौकात हा प्रकार घडला. विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकडे पीएमपीएलएम बसच्या मागील चाकाखाली त्या आल्या होत्या. त्यानंतर बससोबत काही अंतर त्या फरफटत गेल्या. त्यामुळे जागीच त्यांचा करुण अंत झाला. या प्रकरण संबंधित पीएमपीएमएल बसचा चालक आणि वाहक या दोघांना बससह विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?

पीएमपीएमएल बसखाली चिरडून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. बसच्या मागील चाकाखाली आल्यामुळे वृद्धा काही अंतर फरफटत गेली. या अपघातात पद्मा पंढरीनाथ गायकवाड या 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

पद्मा गायकवाड रस्ता ओलांडत असताना हा अपघात झाला. विश्रांतवाडी चौकाकडून भोसरीकडे जाणाऱ्या बसच्या मागील चाकाखाली त्या आल्या. त्यामुळे जागीच त्यांचा करुण अंत झाला. मुकुंदराव आंबेडकर चौकात हा प्रकार घडला.

बस चालक-वाहक ताब्यात

अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. अपघात प्रकरणी संबंधित बसचा चालक, वाहक यांना बससह विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या :

कात्रज परिसरात कंटेनर-कारचा भीषण अपघात; अपघातात एक जण ठार

पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात, पाच जणांचा जागीच मृत्यू, कारचा चक्काचूर

औषधांमुळे डुलकी, अभिनेते हेमंत बिर्जेंच्या कारची दुभाजकाला धडक, पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.