पोस्टात नोकरीच्या आमिषाने पुण्यात 85 युवकांना गंडा, 19 लाखांची फसवणूक, आरोपी फरार

पहिल्यांदा निलेश तावरे याला नोकरीचं आमिष दाखवून आरोपी ज्ञानेश्वर वरे याने त्याच्याकडून 2 लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर तुला नोकरी लागली, असं खोटं सांगून त्याचा विश्वास संपदान केला.

पोस्टात नोकरीच्या आमिषाने पुण्यात 85 युवकांना गंडा, 19 लाखांची फसवणूक, आरोपी फरार
लातूरमध्ये डॉक्टर आणि ट्रॅफिक पोलिसांमध्ये हाणामारी
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 6:40 AM

विनय जगताप, टीव्ही9 मराठी, भोर, पुणे : पुण्यातील भोर तालुक्यात 85 युवकांना पोस्ट खात्यात (Post Office) नोकरी लावण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या युवकांची तब्बल 19 लाख 70 हजार रुपयांना फसवणूक (Cheating) करण्यात आल्याचा आरोप आहे. आरोपींच्या विरोधात भोर पोलिस स्टेशनमध्ये (Bhor Pune) गुन्हा दाखलं करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर वरे असं आरोपीचं नाव आहे. त्याच्या विरोधात निलेश तावरे या युवकाने तक्रार दिली होती. त्यानंतर भोर पोलिसांनी ज्ञानेश्वर वरे विरोधात गुन्हा दाखल केला. आरोपी ज्ञानेश्वर मागील दोन महिन्यांपासून फरार आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. आरोपीने आणखी काही जणांना फसवलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यात 85 युवकांना पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 19 लाख 70 हजारांची फसवणूक करणाऱ्या आरोपी विरोधात भोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरी लागल्याचं सांगून विश्वास मिळवला

आरोपी ज्ञानेश्वर वरे याच्या विरोधात निलेश तावरे या युवकाने तक्रार दिली होती. त्यानंतर भोर पोलीसांनी ज्ञानेश्वर वरे विरोधात गुन्हा दाखल केला. पहिल्यांदा निलेश तावरे याला नोकरीचं आमिष दाखवून त्याच्याकडून 2 लाख रुपये घेण्यात आले. त्यानंतर तुला नोकरी लागली, असं खोटं सांगून त्याचा विश्वास संपदान केला.

पीडिताच्या मित्रांचीही फसवणूक

त्यानंतर आरोपीने पीडित युवकाच्या इतर मित्रांनाही नोकरीला लावतो, असं सांगून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप आहे. मात्र सत्य समोर येताच युवकांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. आरोपी ज्ञानेश्वर मागील दोन महिन्यांपासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान आरोपीने आणखी काही जणांना फसवलं असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

परदेशात नोकरीच्या आमिषाने फसवणूक, किरण गोसावी विरोधात 400 पानी दोषारोपपत्र, 82 साक्षीदारांचा तपास

दिशाभूल करणाऱ्या Ads ना दणका, Sensodyne जाहिरात बंद, Naaptol ला भरभक्कम दंड

नवऱ्याला सरप्राईज गिफ्ट देण्याची तयारी, बायकोलाच बसला शॉक, फसवणुकीमुळे आनंदावर विरजण

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.