Pune Murder | चारित्र्याच्या संशयातून पुण्यात 23 वर्षीय पत्नीची हत्या, साताऱ्याला पळून जाताना नवरा अटकेत

पत्नीची गळा चिरुन हत्या केल्या प्रकरणी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. खून केल्यानंतर पती पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली.

Pune Murder | चारित्र्याच्या संशयातून पुण्यात 23 वर्षीय पत्नीची हत्या, साताऱ्याला पळून जाताना नवरा अटकेत
पुण्यात पतीकडून पत्नीची हत्याImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 7:29 AM

पुणे : पतीने पत्नीची गळा चिरुन हत्या (Wife Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर पती पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला पकडत बेड्या ठोकल्या आहेत. पुणे जिल्ह्यात चाकण जवळील मेदनकरवाडी येथे हत्येची घटना (Pune Crime News) घडल्याचं समोर आलं आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पती सातारा येथे पळून जात होता. त्यावेळी चाकण पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं. सचिन रंगनाथ काळेल असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी पतीचं नाव आहे. त्याने 23 वर्षीय पत्नी अश्विनी सचिन काळेल हिची हत्या केल्याचा आरोप आहे. चारित्र्यावर संशय घेऊन सचिनने तिला जीवे ठार मारल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी पतीला गजाआड (Husband Arrested) केलं.

काय आहे प्रकरण?

पत्नीची गळा चिरुन हत्या केल्या प्रकरणी पतीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. खून केल्यानंतर पती पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र पोलिसांनी त्याला अटक केली. पुणे जिल्ह्यात चाकण जवळील मेदनकरवाडी येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पळून जाणाऱ्या नवऱ्याला अटक

पत्नीचा खून केल्यानंतर पती साताऱ्याला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी चाकण पोलिसांनी ताब्यात घेतलं. सचिन रंगनाथ काळेल असं ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी पतीचं नाव आहे.

चारित्र्याच्या संशयातून हत्या

चारित्र्यावर संशय घेऊन सचिनने 23 वर्षीय पत्नी अश्विनी सचिन काळेल हिची हत्या केल्याचा आरोप आहे. चाकण पोलिसांनी शिताफीने पतीला जेरबंद केलं.

संबंधित बातम्या :

अनैतिक संबंधाच्या संशयावरुन पत्नीचा चाकूने भासकून खून; पत्नी ठार झाल्यानंतर पती फरार, पोलिसांचा शोध सुरु

Nanded Crime | पत्नीची हत्या करुन शेतात पतीची आत्महत्या, कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल

Pune Murder | माझ्या जवळ का येतोस, पत्नीने चापट मारली, पतीने जीव घेतला

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.