Pune Double Murder | हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर, 22 वर्षीय तरुणासह बापालाही संपवलं, पुण्यातील शाळेमागे हत्याकांड

पुणे शहरातील लोणीकंद परिसरात बुधवारी रात्री दुहेरी खुनाची घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. त्यासोबतच त्याच्या वडिलांचाही दगडाने ठेचून खून करण्यात आला.

Pune Double Murder | हत्येच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर, 22 वर्षीय तरुणासह बापालाही संपवलं, पुण्यातील शाळेमागे हत्याकांड
पुण्यात बापलेकाची हत्या
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 9:05 AM

पुणे : दुहेरी हत्याकांडाच्या घटनेमुळे (Pune Double Murder) महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. खुनाच्या गुन्ह्यात तुरुंगात शिक्षा भोगत असताना जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगाराची निर्घृण हत्या करण्यात आली. 22 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे. धक्कादायक म्हणजे आरोपीसोबतच त्याच्या वडिलांचाही खून करण्यात आला. हा डबल मर्डर नेमका कोणी केला, याचं गूढ अद्याप उलगडलेलं नाही. भररस्त्यात रात्रीच्या वेळेस हत्या केल्यानंतर आरोपी हल्लेखोर पसार झाले. हल्लेखोरांचा बापलेकावर कुठला राग होता, की ज्यामुळे दोघांची दगडाने ठेचून निर्घृणपणे हत्या करण्यात आली, हे अजून गुलदस्त्यातच आहे. आरोपींना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

काय आहे प्रकरण?

पुणे शहरातील लोणीकंद परिसरात बुधवारी रात्री दुहेरी खुनाची घटना घडल्याचं उघडकीस आलं आहे. खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आलेल्या गुन्हेगाराची हत्या करण्यात आली. त्यासोबतच त्याच्या वडिलांचाही दगडाने ठेचून खून करण्यात आला. सनी कुमार शिंदे (वय 22 वर्ष) आणि कुमार शिंदे (वय 55 वर्ष) अशी खून झालेल्या बापलेकांची नावं आहेतत.

सनीची 3 महिन्यांपूर्वी जामिनावर मुक्तता

गेल्या वर्षी एका खून प्रकरणात सनी शिंदे याला अटक झाली होती. गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या सनीची 3 महिन्यांपूर्वी जामिनावर मुक्तता झाली होती. तो तुरुंगाच्या बाहेर आल्यावर लोणीकंद येथील शाळेच्या पाठीमागे अज्ञात हल्लेखोरांनी त्याचा खून केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी पुढील तपास सुरु असून हल्लेखोर फरार आहेत. या हत्येचं नेमकं कारण काय आणि बापलेकांची कोणी हत्या केली, याचं रहस्य अद्याप उकललेलं नाही. आरोपींना शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

संबंधित बातम्या :

Pune Murder | अंगणात कोंबड्या आल्यावरुन वाद, बारामतीत महिलेची निर्घृण हत्या

86 व्या वर्षी वडिलांनी मॅरेज ब्युरोत नाव नोंदवलं, पुण्यात पोराने बापालाच संपवलं

जन्मदात्या आईची हत्या, वडिलांवर कोयत्याने वार, जमिनीच्या वादातून इंदापुरात मुलाचा हल्ला

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.