AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Robbery | पुण्यात पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा डाव उधळला, नगरमधील फरार आरोपीसह चौघे ताब्यात

आरोपींनी अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेच्या उसाच्या शेतात आश्रय घेतला. मात्र पोलीस पथकाने शोध घेत चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नवनाथ राजू पवार, अनिकेत बबन पवार पवार, अंकुश खंडू पवार, प्रवीण दत्तात्रय आंबेकर अशी आपली नावे सांगितली.

Robbery | पुण्यात पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याचा डाव उधळला, नगरमधील फरार आरोपीसह चौघे ताब्यात
पुण्यात दरोड्याचा प्रयत्न करणारे जेरबंदImage Credit source: टीव्ही 9
| Edited By: | Updated on: May 13, 2022 | 8:47 AM
Share

पुणे : आळेफाटा येथे पेट्रोल पंपावर दरोडा (Robbery) टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला आळेफाटा पोलिसांनी शस्त्रांसह (Pune Crime News) अटक केली. यामध्ये मोक्कातील अहमदनगर येथील फरार आरोपी अंकुश खंडू पवार याच्यासह चौघांना ताब्यात घेतले असून यामधील तीन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. नगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील आळे शिवारात पहाटे ही कारवाई करण्यात आली. तर पुणे-नाशिक महामार्गावरील (Pune Nashik Highway Petrol Pump) आळेफाटा येथील एका पेट्रोल पंपावर सराईत चोरट्यांची टोळी दरोडा टाकणार असल्याचे तपासात उघड झाले. आरोपींनी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच आणि पारनेर अहमदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.

कोणाकोणाला अटक?

नवनाथ राजू पवार (वय 21, रा. ढोकी, पारनेर जि. अहमदनगर), अनिकेत बबन पवार पवार (वय 20, रा. साळवाडी, ता. जुन्नर), अंकुश खंडू पवार (रा. तांबवाडी वडगाव सावताळ, ता.पारनेर जि. अहमदनगर), प्रवीण दत्तात्रय आंबेकर (वय 25, रा.तांबवाडी वडगाव सावताळ, ता.पारनेर जि. अहमदनगर अशी अटक करण्यात आलेल्यांची आरोपींची नावे असून अमोल कैलास शिंदे (वय 21, रा. धोत्रे, पारनेर जि. अहमदनगर), विकास बर्डे (रा. लाखणगाव, ता. आंबेगाव जि. पुणे), विशाल खंडू पवार (रा. तांबवाडी वडगाव सावताळ, ता. पारनेर जि. अहमदनगर अशी फरार आरोपींची नावे आहेत.

नेमकं काय घडलं?

याबाबत आळेफाटा पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी दिलेली माहिती अशी की, ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आळे गावाच्या हद्दीतील बोरीफाटा येथे आळेफाट्याकडे जाणारे संशयित वाहने चेक करण्याचे काम सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास चालू होते. दरम्यान आळेफाटा बाजूला ओमिनी एम.एच 14 ए.जी 7203 भरधाव वेगाने गेली. पथकाला संशय आल्याने ओमिनीचा पाठलाग केला.

आरोपींनी अंधाराचा फायदा घेत रस्त्याच्या कडेच्या उसाच्या शेतात आश्रय घेतला. मात्र पोलीस पथकाने शोध घेत चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी नवनाथ राजू पवार, अनिकेत बबन पवार पवार, अंकुश खंडू पवार, प्रवीण दत्तात्रय आंबेकर अशी आपली नावे सांगितली. तर तीन आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाले.

पाच दिवस पोलीस कोठडी

दरम्यान आळेफाटा पोलीस ठाण्यात पोलिसांनी दरोड्याची तयारी करत असल्याबाबत भा.दं.वि कलम 399 प्रमाणे गुन्हा दाखल करत अटक चार आरोपींना न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने आरोपींना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तपासाला गती दिली. पुढील तपासात आरोपी अंकुश खंडू पवार हा कल्याण जिल्हा ठाणे तालुका पोलीस ठाणे येथून गेल्या एक वर्षापासून मोक्कातील फरार आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

आठ गुन्ह्यांची कबुली

आरोपींनी संघटीत आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच तर पारनेर जि. अहमदनगर पोलीस स्टेशन हद्दीत तीन अशा आठ गुन्ह्यांची कबुली दिली असून इतरही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहे. फरार तीन आरोपींना शोधण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे.

पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, उपनिरीक्षक रघुनाथ शिंदे, पोलीस हवालदार चंद्रा डुंबरे, लहानू बांगर, विनोद गायकवाड, भीमा लोंढे, पद्मसिंह शिंदे, मोहन आनंदगावकर, होमगार्ड सागर भोईर, पोलीस मित्र नामदेव पानसरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.